धक्कादायक, प्रवाशांनी वर्गणी गोळा करून हटवला दुर्गम भागातील भलामोठा वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST2021-07-22T04:20:06+5:302021-07-22T04:20:06+5:30

मोलगी ते बिजरीगव्हाण, बारीसुरगस, पिंपळखुटा बर्डी, वेहगी, वडफळी या मार्गाने गुजरात राज्यातील डेडियापाड्याकडे अनेक वाहने मार्गस्थ होतात. मंगळवारी मार्गावरील ...

Shockingly, the passengers collected subscriptions and removed a large tree in a remote area | धक्कादायक, प्रवाशांनी वर्गणी गोळा करून हटवला दुर्गम भागातील भलामोठा वृक्ष

धक्कादायक, प्रवाशांनी वर्गणी गोळा करून हटवला दुर्गम भागातील भलामोठा वृक्ष

मोलगी ते बिजरीगव्हाण, बारीसुरगस, पिंपळखुटा बर्डी, वेहगी, वडफळी या मार्गाने गुजरात राज्यातील डेडियापाड्याकडे अनेक वाहने मार्गस्थ होतात. मंगळवारी मार्गावरील रेटाआंबापाडा गावाजवळ भलामोठा वृक्ष कोसळल्याने रस्ता बंद पडला होता. यातून पिंपळखुटा परिसरातून मोलगी येणारे व मोलगी भागातून वडफळी परिसरात जाणाऱ्या नागरिकांना वंतीफाट्यापासून भगदरी मार्गाने प्रवास करावा लागला होता. रस्ता व्यापून टाकणारा हा वृक्ष काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रशासकीय तरतूद करण्यात आलेली नसल्याने अखेर, या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून अक्षरश: १० आणि २० रुपये वर्गणी गोळा करून मोलगी येथून जेसीबी भाड्याने आणून वृक्ष बाजूला केला. जेसीबीने बाजूला केलेला वृक्ष या भागातील ग्रामस्थांनी कुऱ्हाडीचे घाव घालून मोकळा करत मार्ग पूर्णपणे स्वच्छ करुन वाहतूक सुरळीत करुन दिली. आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाने लाखो रुपयांचा निधी लाटणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोणत्याही शाखा अभियंता किंवा अधिकाऱ्यांना याची माहीतच नसल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांनी मोलगी आणि अक्कलकुवा येथे संपर्क करुन याबाबत माहिती दिल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Shockingly, the passengers collected subscriptions and removed a large tree in a remote area