शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात शासकीय कार्यालयांसह सर्वत्र शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांमध्ये कामकाज बंद असल्याने नागरिकांची वर्दळ कमी झाल्याने शुकशुकाट आढळून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांमध्ये कामकाज बंद असल्याने नागरिकांची वर्दळ कमी झाल्याने शुकशुकाट आढळून आला तर मध्यवर्ती बसस्थानकातही प्रवाशांची गर्दी कमी होती. कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या आवाहनास नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिवसभर शहरात होते.शहादा पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय, न्यायालय, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये शुक्रवारी नागरिकांनी येणे टाळल्याने नेहमी असलेली गर्दी आढळून आली नाही. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकात दररोज मोठी गर्दी असते. मात्र सकाळपासूनच गर्दीचे प्रमाण ओसरल्याने शुकशुकाट आढळून आला. शहादा आगारातर्फे १८ मार्चपासून वातानुकूल शिवशाही बसेस शहादा-मुंबई, शहादा-पुणे व शहादा-मुंबई सीटर या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर दररोज सुरू असणाºया सकाळची पुणे व मुंबई त्याचप्रमाणे दोन नाशिकच्या फेºया व एक जळगावची फेरी पुढील आदेश होईपर्यंत रद्द करण्यात आलेली आहे. शहादा आगारातर्फे प्रवाशांना हात धुण्यासाठी पाणपोईजवळ सेनीटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ड्युटीवर असणाºया वाहक व चालकांना मास्क उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आगारातील बसेसची स्वच्छता नियमित करण्यात येत असून पालिकेच्या माध्यमातून सकाळी व दुपारी निर्जंतुकीकरण केले जात आहे.कोरोना व्हायरसचा मुकाबला समर्थपणे करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. त्याचप्रमाणे शासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी व मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.कोरोना व्हायरसने संपूर्ण भारतभर थैमान घातले असून त्याच्या बचावासाठी मास्कची विक्री होत आहे. कोणीही रिटेलर किंवा घाऊक औषध विक्रेत्याने मास्क व सेनिटायझर बिलात घ्यावे व विक्रीही बिलात करावी. जास्त दराने मास्क व सेनिटायझरची विक्री करू नये. असे आढळल्यास त्याच्यावर संघटनात्मक तसेच प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा नंदुरबार जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे सेंट्रल झोन सदस्य विजय चव्हाण, अध्यक्ष राजेंद्र डागा, सचिव जाकीर सैयद, जनसंपर्क अधिकारी ललित छाजेड यांनी विक्रेत्यांना दिला आहे.