शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

संपुर्ण संचारबंदीमुळे शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रशासनाने शहरात रविवारपासून संपुर्ण संचारबंदी लागू केली असून भाजीपाला व किराणा दुकानेही बंद ठेवण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रशासनाने शहरात रविवारपासून संपुर्ण संचारबंदी लागू केली असून भाजीपाला व किराणा दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. दवाखाना व औषध खरेदी व्यतिरिक्त कुणालाही रस्त्यावर फिरण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे शहरात सकाळपासूनच शुकशुकाट होता. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरीकेड्स देखील लावले होते. शिवाय एसआरपीची तुकडीही तैणात केली आहे.जिल्ह्यालगतच्या काही शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे शहरात दिवसभर पुर्ण शुकशुकाट होता.स्वयंस्फूर्त आणि सक्तीची...तीन आठवड्यापूर्वी अर्थात २२ मार्च रोजी पंतप्रधानांच्या आवाहानानुसार नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला होता. त्या दिवशी जसा शुकशुकाट होता तसाच शुकशुकाट रविवार, १२ एप्रिल रोजी दिसून आला. २३ मार्च पासून लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली असली तरी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सूट देण्यात आली होती. त्यामुळे नागरिक खरेदीसाठी बाजारात गर्दी करीत होते. त्यामुळे वेळ ठरवून ती सकाळी ८ ते १२ करण्यात आली. तरीही गर्दीवर नियंत्रण राहत नव्हते. अखेर बाजारपेठ परिसरच सील करण्यात आल्याने त्यावर नियंत्रण मिळाले. परंतु रविवारी संपुर्ण संचारबंदी लागू करीत प्रशासनाने सक्तीने वागण्याचे ठरविल्याचे दिसून आले.भाजीपाला, किराणाही बंदरविवारी भाजीपाला विक्री, किराणा दुकान, फळ विक्री संपुर्णत: बंद करण्यात आली होती. केवळ दूध विक्री केंद्र ठराविक वेळेपुरते सुरू होते. औषधी दुकाने व हॉस्पीटल पुर्ण दिवस सुरू होते. पोलिसांनी शहरातील चारही प्रमुख चौफुलींवर बंदोबस्त तैणात केला होता. प्रत्येकाची चौकशी करूनच सोडले जात होते. ठिकठिकाणी आणि चौकाचौकात बंदोबस्त वाढविण्यात आला होता. एसआरपीची तुकडीही ठिकठिकाणी तैणात करण्यात आली होती. नागरिकांनीही प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.धानोरा येथे पाहुणे म्हणून आलेल्या तिघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते गावात आले होते. याबाबतची कुणकुण गावातील लोकांना लागल्यावर प्रशासनाला कळविण्यात आले. प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने तिघांना शोधून काढले. त्यांना नंदुरबार येथील क्वारंटाईन केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोघांचीही तपासणी करून त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले. दरम्यान इतरही गावांमध्ये असे कुणी पाहुणे आले असल्यास तातडीने प्रशासनाला कळवावे. नागरिकांनी देखील सतर्क राहून बाहेरच्या व्यक्तींना येवू देवू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.