शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे येथे उमजमाता यात्रेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : जागृत देवस्थांनांपैकी एक असलेल्या शिंदे, ता.नंदुरबार येथे स्वयंभू उमजमाता यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : जागृत देवस्थांनांपैकी एक असलेल्या शिंदे, ता.नंदुरबार येथे स्वयंभू उमजमाता यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. आठ दिवस या यात्रेसाठी ठिकठिकाणाहून व्यापारी दाखल झाले आहे.शंभर वर्षांपूर्वी खोडसगाव व शिंदे येथील गावकऱ्यांची भक्ती पाहून उमज माता शिंदे-खोडसगाव रस्त्यावर प्रकट झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते. मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून उमज मातेला मानले जाते. मनोकामना पूर्ण झाली तर भाविक यात्रेनिमित्त येथे नवस फेडत आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येला ग्रामस्थांकडून गावदिवाळीचा उपक्रम राबविण्यात आला. १९ रोजी सोंगाड्यांचा तर २० रोजी तमाशा मंडळाचा कार्यक्रम घेण्यात आला. सायंकाळी मंदिरावर लाकडी घोडे चढविण्यात येत आहे. ज्या भाविकांची मनोकामना पूर्ण झाली असेल ते भाविक लाकडी घोडे बनवून वाजतगाजत मंदिरावर येऊन चढवतात. शेजारीच अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील जलदेवता मंदिर आहे. या यात्रेत विविध वस्तू विक्रेत्यांनी दुकाने थाटली असून मनोरंजनाची साधनेही यात्रेत दाखल झाली आहेत. भाविकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती, ग्रामसुरक्षा दल, विठ्ठल सेवा समिती, भजनी मंडळ, आप की जय परिवार, एकलव्य मित्र मंडळ आदींचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. तर सरपंच मंगलाबाई भिल, उपसरपंच गिरधर पटेल, शैलेश पाटील, कालुसिंग भिल, दिलीप भिल, शांताबाई पाटील, उषाबाई भिल, सोनी भिल, बायाबाई भिल, ग्रामसेवक व्ही.डी. महाले हे यात्रेकरुंसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देत आहे.