शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शहादा : उत्सव काळात 60 वर्षपूर्वीच्या दागिण्यांचा साज नवसाला पावणारा शेंदूर चर्चीत गणेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शेंदूर  चर्चीत गणपती हा शहादा शहराचे आराध्य दैवत आहे. शेंदूर चर्चीत गणेशाची ही मूर्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शेंदूर  चर्चीत गणपती हा शहादा शहराचे आराध्य दैवत आहे. शेंदूर चर्चीत गणेशाची ही मूर्ती पुरातन व दुर्मिळत आहे.शहादा शहरातील सोनार गल्लीत पुरातन धर्मशाळा होती. नर्मदा परिक्रमेतील मार्गात या धर्मशाळेचा उल्लेख असून, परिक्रमा करणा:या भक्तांचा दोन दिवसांचा मुक्काम या धर्मशाळेत होत असल्याचे जाणकार सांगतात.मोगल काळात सुलतानपूर परगणा म्हणजे तालुक्याचे ठिकाण असतांना तेथे शेंदूर चर्चीत गणपतीची ही मूर्ती सापडली होती. तेथून ही मूर्ती शहाद्याच्या या धर्मशाळेत आणून तिची स्थापना करण्यात आल्याचे जुणे जानकार सांगतात. चार  हात असलेली व सुमारे तीन फुट उंचीची ही शेंदूर चर्चीत गणेश मूर्ती दुर्मिळ आहे. गणपती सोबत या मंदिरात 24  हातांची भुवनेश्वरी माता व शेंदूर चर्चीत महालक्ष्मी देवीची मूर्ती आहे.या पुरातन गणपती मंदिरास ब्रिटीश काळात देखरेखीसाठी  दहामहा मानधन मिळत असल्याची माहिती मंदिराचे पुजारी अॅड.प्रफुल्ल पाठक यांनी दिली. पाठक यांची तिसरी पिढी या मंदिराची सेवा करीत असून, दरवर्षी माघ व भाद्रपद शुद्ध चतुर्थी असे दोन गणेशोत्सव मंदिरात साजरे केले जातात.उत्सव काळात 60 वर्षापूर्वीच्या विविध दागिण्यांचा साज मूर्तीवर चढविण्यात येतो. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ख्याती असल्याने अजूनही शहरातील जुने व्यापारी, नागरीक आणि गणेशभक्त गणरायाचे दर्शन घेऊनच दिवसाची सुरूवात करतात.

4पूर्वी लाकडी इमारत असलेली ही धर्मशाळा 1940 साली आगीत भस्मसात झाली होती. तेव्हा या धर्मशाळेच्या पहिल्यांदा जीर्णोद्धार करण्यात आला होता. कालांतराने धर्मशाळेचा उपयोग कमी होत गल्याने संपूर्ण धर्मशाळेला मंदिराचे स्वरूप देण्यात येवून पुरातन गणपती मंदिराचे दुस:यांदा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. मंदिराच्या बाहेर सुंदर कोरीव काम करण्यात येत असून, आत भव्य सभामंडप करण्यात आला आहे. मागील महिन्यात झालेल्या संततधा पावसात मंदिरातील फरशीखाली मोठे भुयार आढळून आले होते. मंदिर प्रशासनाने भुयारात भराव टाकून पुन्हा आराध्य दैवत असलेल्या या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी गणेशभक्तांनी सढळ हाताने मदत करण्याची आवश्यकता आहे.