शहादा : उत्सव काळात 60 वर्षपूर्वीच्या दागिण्यांचा साज नवसाला पावणारा शेंदूर चर्चीत गणेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 12:16 PM2019-09-04T12:16:44+5:302019-09-04T12:16:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शेंदूर  चर्चीत गणपती हा शहादा शहराचे आराध्य दैवत आहे. शेंदूर चर्चीत गणेशाची ही मूर्ती ...

Shahada: Ganesha celebrated 60 years ago during the festival | शहादा : उत्सव काळात 60 वर्षपूर्वीच्या दागिण्यांचा साज नवसाला पावणारा शेंदूर चर्चीत गणेश

शहादा : उत्सव काळात 60 वर्षपूर्वीच्या दागिण्यांचा साज नवसाला पावणारा शेंदूर चर्चीत गणेश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शेंदूर  चर्चीत गणपती हा शहादा शहराचे आराध्य दैवत आहे. शेंदूर चर्चीत गणेशाची ही मूर्ती पुरातन व दुर्मिळत आहे.
शहादा शहरातील सोनार गल्लीत पुरातन धर्मशाळा होती. नर्मदा परिक्रमेतील मार्गात या धर्मशाळेचा उल्लेख असून, परिक्रमा करणा:या भक्तांचा दोन दिवसांचा मुक्काम या धर्मशाळेत होत असल्याचे जाणकार सांगतात.
मोगल काळात सुलतानपूर परगणा म्हणजे तालुक्याचे ठिकाण असतांना तेथे शेंदूर चर्चीत गणपतीची ही मूर्ती सापडली होती. तेथून ही मूर्ती शहाद्याच्या या धर्मशाळेत आणून तिची स्थापना करण्यात आल्याचे जुणे जानकार सांगतात. चार  हात असलेली व सुमारे तीन फुट उंचीची ही शेंदूर चर्चीत गणेश मूर्ती दुर्मिळ आहे. गणपती सोबत या मंदिरात 24  हातांची भुवनेश्वरी माता व शेंदूर चर्चीत महालक्ष्मी देवीची मूर्ती आहे.
या पुरातन गणपती मंदिरास ब्रिटीश काळात देखरेखीसाठी  दहामहा मानधन मिळत असल्याची माहिती मंदिराचे पुजारी अॅड.प्रफुल्ल पाठक यांनी दिली. पाठक यांची तिसरी पिढी या मंदिराची सेवा करीत असून, दरवर्षी माघ व भाद्रपद शुद्ध चतुर्थी असे दोन गणेशोत्सव मंदिरात साजरे केले जातात.
उत्सव काळात 60 वर्षापूर्वीच्या विविध दागिण्यांचा साज मूर्तीवर चढविण्यात येतो. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ख्याती असल्याने अजूनही शहरातील जुने व्यापारी, नागरीक आणि गणेशभक्त गणरायाचे दर्शन घेऊनच दिवसाची सुरूवात करतात.

4पूर्वी लाकडी इमारत असलेली ही धर्मशाळा 1940 साली आगीत भस्मसात झाली होती. तेव्हा या धर्मशाळेच्या पहिल्यांदा जीर्णोद्धार करण्यात आला होता. कालांतराने धर्मशाळेचा उपयोग कमी होत गल्याने संपूर्ण धर्मशाळेला मंदिराचे स्वरूप देण्यात येवून पुरातन गणपती मंदिराचे दुस:यांदा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. मंदिराच्या बाहेर सुंदर कोरीव काम करण्यात येत असून, आत भव्य सभामंडप करण्यात आला आहे. मागील महिन्यात झालेल्या संततधा पावसात मंदिरातील फरशीखाली मोठे भुयार आढळून आले होते. मंदिर प्रशासनाने भुयारात भराव टाकून पुन्हा आराध्य दैवत असलेल्या या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी गणेशभक्तांनी सढळ हाताने मदत करण्याची आवश्यकता आहे. 
 

Web Title: Shahada: Ganesha celebrated 60 years ago during the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.