शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षे विनावेतन सेवा केली, पहिला पगार आला, परंतु कोरोनाने घात केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST

पुष्पाबाई जयवंत सोनवणे या उपशिक्षिका म्हणून माध्यमिक विद्यालय सोनवल त.बो. येथे कार्यरत होत्या. विनाअनुदान तत्त्वावरील या शाळेत पुष्पाबाई या ...

पुष्पाबाई जयवंत सोनवणे या उपशिक्षिका म्हणून माध्यमिक विद्यालय सोनवल त.बो. येथे कार्यरत होत्या. विनाअनुदान तत्त्वावरील या शाळेत पुष्पाबाई या १३ वर्षांपासून विनावेतन कार्यरत होत्या, तर त्यांचे पती जयवंत सोनवणे हे जिल्हा परिषद शाळा तऱ्हाडी, तर्फे बोरद येथे कार्यरत आहेत. शाळेला २० टक्के अनुदान मिळाल्यानंतर पगार सुरू होईल, या आनंदात त्या होत्या. अपेक्षेप्रमाणे २० टक्के अनुदानाचा पगार त्यांच्या बॅंक खात्यात जमाही झाला, परंतु ते कळण्याच्या आधीच पुष्पाबाई यांचा कोरोनाने मृत्यू झाला. १९ दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली होती. सोनवणे कुटुंबात दोन आठवड्यांच्या कालावधीत चार जणांचा मृत्यू झाला.

पुष्पाबाई सोनवणे याचे सासरे यशवंत शिवराम सोनवणे (७१) व त्यांच्या पत्नी केवळबाई यशवंत सोनवणे (६४) यांचाही कोरोनानेच मृत्यू झाला. यशवंत सोनवणे यांनी खर्देखुर्द येथील माध्यमिक शाळेत प्रामाणिक सेवा केली होती. कमी पगारातही संसार चालवून सोनवणे दाम्पत्याने दोन्ही मुली व मुलांना चांगले शिक्षण दिले, नोकरीला लावले. मुलीचा मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पुष्पाबाई यांच्या आई निंबाबाई आनंदा पाटील (६२) रा.सोनवल यांचाही मृत्यू झाला. आई, वडील, पत्नी व सासू यांच्या निधनामुळे शिक्षक जयवंत हे खचले. परंतु कुटुंबाला सावरण्यासाठी त्यांनी पुन्हा उभे राहून कुटुंबाला धीर दिला.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहादा शहरात माझी सैनिक यांनी प्रशासनाला मदत करावी, म्हणून रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी या दोन्ही दाम्पत्यांनी त्या माझी सैनिकांचे औक्षण केले होते. पुष्पाबाई यांचा स्वभाव अतिशय दयाळू. शाळेच्या इमारतीच्या बांधकामाच्या अगोदर गावातील खोल्यांमध्ये वर्ग भरायचे, त्यावेळी दररोज शाळेत जाताना पुष्पाबाई या गावातील ठरावीक वृद्ध महिलांसाठी पोळीभाजी घेऊन जायच्या. उपचार घेत असताना दवाखान्यात सुरुवातीच्या काळात बोलणे चालणे व्यवस्थित असताना त्या म्हणायच्या, नर्स व स्टाफ एवढी सेवा करत आहेत, तर मी चांगली होऊन घरी जाईन. ज्या दिवशी दवाखान्यात सुट्टी होईल, त्या दिवशी त्यांना साड्या घेण्यासाठी पैसे देऊन मगच घरी जाईल, परंतु काळाला ते मान्य नव्हते. त्यांच्यापश्चात पती, दोन मुले व सून असा परिवार आहे.