मुलीस पळविणाऱ्या तरुणाला सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 12:39 IST2020-01-14T12:39:47+5:302020-01-14T12:39:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अल्पवयीन तरुणीस पळवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या युवकास दहा वर्ष सश्रम कारावास व दहा हजार ...

Sentenced to death for abducting a girl | मुलीस पळविणाऱ्या तरुणाला सश्रम कारावास

मुलीस पळविणाऱ्या तरुणाला सश्रम कारावास

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अल्पवयीन तरुणीस पळवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या युवकास दहा वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली.
नवापूर तालुक्यातील ढोंग येथे ही घटना घडली होती. २७ जून २०१८ रोजी दुपारी ढोंग येथील अल्पवयीन मुलगी खांडबारा येथे शाळेत आली असता बेपत्ता झाली होती. तिचा ठिकठिकाणी शोध घेवूनही ती मिळून आली नव्हती.
मुलीचे रवींद्र संभू गावीत यांच्याशी प्रेमसंबध असल्याने त्यानेच पळवून नेल्याचे स्पष्ट झाल्यावर मुलीच्या वडिलांनी रवींद्र गावीत याच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र सहायक पोलीस निरिक्षक धनंजय पाटील यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केले होते.
न्या.प्रमोद तरारे यांच्यापुढे हा खटला चालला. साक्षी, पुरावे लक्षात घेता गुन्हा सिद्ध झाल्याने रवींद्र गावीत यास दहा वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सुशिल पंडित यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून नितीन साबळे व गिरीष पाटील यांनी काम पाहिले.

Web Title: Sentenced to death for abducting a girl