सीताखाई पॉईंटजवळ जीव धोक्यात घालून घेतात ‘सेल्फी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 01:21 PM2017-12-27T13:21:26+5:302017-12-27T13:22:27+5:30

Self-threatens life near Sitakhi point | सीताखाई पॉईंटजवळ जीव धोक्यात घालून घेतात ‘सेल्फी’

सीताखाई पॉईंटजवळ जीव धोक्यात घालून घेतात ‘सेल्फी’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथील सीताखाई पॉईंटजवळ काही हौशी पर्यटक जीव धोक्यात घालून मोबाईलमध्ये         सेल्फी घेतात. त्यांना आवर घालण्यासाठी येथे पोलीस बंदोबस्त किंवा इतर उपाययोजना करण्याची गरज आहे.
तोरणमाळ येथे पर्यटकांची नेहमी गर्दी असते. तोरणमाळला जाणारा रस्ता घाटातून जातो. येथे यशवंत तलाव, सीताखाई पॉईंट, सन्सेट पॉईंट, मच्छींद्रनाथ गुंफा आदी ठिकाणी पर्यटक जातात. यातील सीताखाई पॉईंट उंचावर आहे. खाली वाकून पाहिले तर तळ दिसत नाही. याठिकाणी मात्र काही हौशी पर्यटक मोबाईलमध्ये सेल्फी घेण्यासाठी जीव धोक्यात घालताना दिसून येतात. संरक्षक कठडय़ावर उभे राहून किंवा हे कठडे ओलांडून सेल्फी घेतात.         त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा पर्यटकांना आवर घालण्यासाठी याठिकाणी पोलीस बंदोबस्त किंवा इतर उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
 

Web Title: Self-threatens life near Sitakhi point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.