शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ११ शाळांची आदर्श शाळा म्हणून निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:31 IST

आकर्षक शाळा इमारत विद्यार्थीनुसार वर्ग खोल्या मुला-मुलींकरीता स्वतंत्र व पुरेशी स्वच्छता गृहे, पेयजल सुविधा व हँड वॉश स्टेशन मध्यान्ह ...

आकर्षक शाळा इमारत विद्यार्थीनुसार वर्ग खोल्या मुला-मुलींकरीता स्वतंत्र व पुरेशी स्वच्छता गृहे, पेयजल सुविधा व हँड वॉश स्टेशन मध्यान्ह भोजनाकरीता स्वयंपाकगृह व भांडार कक्ष शैक्षणिक साहित्य खेळाचे साहित्य ग्रंथालय, संगणक कक्ष, व्हर्च्युअल क्लास रूमसह शाळेत विद्युतीकरण सुविधा, शाळेला संरक्षक भिंत, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून शाळेत अग्निशमन उपायोजनासह आपत्कालीन व्यवस्थेची उपलब्धता, परिसरातील शाळेमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करणे, उत्कृष्ट शिक्षकांना देशांतर्गत व देशाबाहेरील प्रशिक्षणासाठी पाढविणे. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची स्काॅलरशीप परीक्षेची तयारी करून घेणे आदी सुविधा विकसित करणे अपेक्षित आहे.

या आदर्श शाळांमध्ये वरील सुविधा शासकीय निधी शिवाय सिएसआर फंड व लोकसहभागातून उपलब्ध करून द्याव्यात. तसेच सर्व शासकीय, जिल्हास्तरीय व ग्रामस्तरीय योजनांचे एकत्रिकरण करून सदर शाळा विकसित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात यावा, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी बालिका स्कूल उमरी,ता अक्कलकुवा, कस्तुरबा गांधी बालिका स्कूल कोराई, ता.अक्कलकुवा, अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय निवासी शाळा, तोरणमाळ, ता.धडगाव, कस्तुरबा गांधी बालिका स्कूल जुने धडगाव, लोकमान्य टिळक हायस्कूल नंदुरबार, कस्तुरबा गांधी बालिका स्कूल टोकरतलाव नंदुरबार, जि.प. शाळा भादवद, ता. नवापूर, कस्तुरबा गांधी बालिका शाळा वाकीपाडा ता. नवापूर, म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूल शहादा, कस्तुरबा गांधी बालिका स्कूल मोहिदेतर्फे हवेली, ता.शहादा, जि.प. प्राथमिक शाळा पुर्नवसन क्रमांक चार ता. तळोदा, कस्तुरबा गांधी बालिका स्कूल तऱ्हावद, ता.तळोदा अशा ११ शाळांचा समावेश करण्यात आलेला आहे. ११ पैकी सात शाळा या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय असून, दोन जिल्हा परिषदेच्या तर एक आंतरराष्ट्रीय निवासी शाळा व शहादा नगरपालिकेच्या शाळेचा समावेश आहे.

स्वातंत्रपूर्व काळात इ.स. १९१३ साली पंडित वकिलांनी म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूल या शाळेची स्थापना केली होती. सध्या ही शाळा नगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत संचालित करण्यात येत आहे. येथे पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. सद्य:स्थितीला एकूण एक हजार ५९ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. खानदेशातील सर्वाधिक जुनी शाळा म्हणून, या शाळेची नोंद आहे. राजकीय अनावस्था व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे या शाळेची तर दुरावस्था झाली असून, इमारतीची भयावह परिस्थिती आहे. अनेक आजी-माजी आमदारांसह शहादाचे नगराध्यक्ष डॉक्टर, इंजिनीअर, वकील व राजकारणात विविध पक्षाचे नेतृत्व करणारे या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या शाळेने आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. आता राज्य शासनाने या शाळेला आदर्श शाळा म्हणून घोषित केले असून, वर्षभरात येथे उच्च दर्जेदार शिक्षणासह विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी राज्य शासनासह शहादा नगरपालिका व विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. शाळेचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी ही सुवर्णसंधी प्राप्त झाली असल्याने एकत्रितपणे आता सामूहिकरीत्या सर्वांची जबाबदारी निश्चितच वाढली आहे