कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २२३ जणांना ‘जनआरोग्य’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:33 IST2021-04-28T04:33:10+5:302021-04-28T04:33:10+5:30

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात एकूण पाचजणांचे उपचारानंतरचे क्लेम शिल्लक होते. एकूण ५६ जणांवर उपचार करून त्यांना ...

In the second wave of corona, 223 people received the support of 'public health' | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २२३ जणांना ‘जनआरोग्य’चा आधार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २२३ जणांना ‘जनआरोग्य’चा आधार

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात एकूण पाचजणांचे उपचारानंतरचे क्लेम शिल्लक होते. एकूण ५६ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले होते. ३७ जणांवर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत; तर ११ जणांचे जनआरोग्य योजनेंतर्गतचे उपचारांचे शेड्यूल तयार करण्यात आले आहे. एकूण २२३ जणांना ऐन कोरोनाकाळात गंभीर आजारांवर उपचार मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होते. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या एका वर्षात २२ हजार नागरिकांनी लाभ घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालय, नवापूर आणि तळोदा उपजिल्हा रुग्णालय, अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात तर नंदुरबार येथील तीन आणि शहादा येथील दोन खासगी रुग्णालयांत या योजनेंतर्गत उपचार होत आहेत. कोविड काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येकी दोन बेड तातडीने तयार ठेवण्याची सोय करण्यात आल्याची माहिती आहे. यातही गंभीर रुग्ण असल्यास त्यांना तातडीने दाखल करून घेतले जात असल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: In the second wave of corona, 223 people received the support of 'public health'