खावटी योजनेचे अर्ज छाननीचे काम तळोदा प्रकल्प कार्यालयात रात्रभर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST2021-04-07T04:31:04+5:302021-04-07T04:31:04+5:30

खावटी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तळोदा प्रकल्प कार्यालयाकडून नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्प कार्यालयात आश्रमशाळा व प्रशासनातील कर्मचाऱ्यांची तीन शिफ्टमध्ये ...

Scrutiny of applications for Khawati scheme continues overnight at Taloda project office | खावटी योजनेचे अर्ज छाननीचे काम तळोदा प्रकल्प कार्यालयात रात्रभर सुरू

खावटी योजनेचे अर्ज छाननीचे काम तळोदा प्रकल्प कार्यालयात रात्रभर सुरू

खावटी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तळोदा प्रकल्प कार्यालयाकडून नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्प कार्यालयात आश्रमशाळा व प्रशासनातील कर्मचाऱ्यांची तीन शिफ्टमध्ये नियुक्ती नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी ६ ते २ वाजेच्या वेळात २५ कर्मचारी, तर दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंच्या वेळात १८ कर्मचारी, रात्री १० ते सकाळी ६ वाजेदरम्यान १३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या अर्ज छाननी कामातील काही कर्मचारी गैरहजर राहत होते. अशा कर्मचाऱ्यांवर प्रकल्प अधिकाऱ्यांनी तात्काळ नोटीस बजावून एक दिवस वेतन कपातीची कारवाई केली आहे. कामाचा आवाका पाहता ४ एप्रिल रोजी एका कामासाठी सुधारित आदेश काढून अधिकच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन आदेशात शासकीय अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षिका व अधीक्षिकांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या सुधारित आदेशानुसार सकाळी १० ते ५ यादरम्यान आठ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती खावटी वितरण कामासाठी करण्यात आली आहे. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंतच्या शिफ्टसाठी ११ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुपारी २ ते रात्री १० वाजेच्या शिफ्टसाठी नव्याने ११ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

Web Title: Scrutiny of applications for Khawati scheme continues overnight at Taloda project office