तळोद्यात शालेय विद्यार्थ्यांच्या कलाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 02:02 PM2020-01-15T14:02:54+5:302020-01-15T14:03:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी नेमसुशिल विद्यामंदिरात हर्षोत्सव सोहळा घेण्यात आला. त्यात नेमसुशिल ...

School students' artwork in Taloda | तळोद्यात शालेय विद्यार्थ्यांच्या कलाविष्कार

तळोद्यात शालेय विद्यार्थ्यांच्या कलाविष्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी नेमसुशिल विद्यामंदिरात हर्षोत्सव सोहळा घेण्यात आला. त्यात नेमसुशिल व श्री मोती विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी नृत्य समूह, वैयक्तीक नृत्य गीतगायन, एकपात्री नाटक यासह विविध कलाप्रकारात सहभाग घेत कलाविष्कार सादर केला.
हर्षोत्सव सोहळ्यास संस्थाध्यक्ष निखिल तुरखिया, संचालिका सोनाबाई तुरखिया, उपाध्यक्ष डी.एम.महाले, सचिव संजय पटेल, वतनकुमार मगरे, रूपलबेन शहा, भावना बाविसी, हर्षिल तुरखिया, मुख्याध्यापिका पुष्पा बागुल, प्राचार्य एस.एस. परदेशी, नलिनी शहा, प्राचार्य पी.डी.शिंपी, मुख्याध्यापिका भावना डोंगरे, गणेश बेलेकर आदी उपस्थित होते.
यावेळी गीटार व चंद्राची भव्य प्रतिमा, सेल्फी पॉईंट म्हणून रसिकांना भुरळ घालत होती. खरी कमाई अंतर्गत विविध खाद्य पदार्थ्यांचे स्टॉल लावण्यात आले. सोहळ्यात परिक्षक म्हणून गोविंद सामुद्रे, योगेश मोरे, सतिष साठे, राहुल खोंडे, मीत राठोड, सागर वाल्हे यांनी काम पाहिले. सोहळ्यात प्रथम व द्वितीय प्राप्त विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
महोत्सवात बेटी बचाओ महिलांवरील वाढते अत्याचार, देशभक्ती, नारी शक्ती, प्रियंका रेड्डी श्रद्धांजली, पोवाडे, शिव तांडव, शिवाजी महाराजांची कीर्ती, लावण्या अशा विविध प्रबोधनात्मक विषयांवर सादरीकरण करण्यात आले. यातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला व गुणांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न दोन्ही शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील नृत्य सादर करतांना उत्साही दिसून आले.
यातील कागदी वस्त्र फॅशन शो स्पर्धा आकर्षण ठरली. यावेळी गीटार व चंद्राची भव्य प्रतिमा, सेल्फी पॉईंट म्हणून रसिकांना भुरळ घालत होती. खरी कमाई अंतर्गत विविध खाद्य पदार्थ्यांचे स्टॉल लावण्यात आले. हर्षोत्सवात अरुण कुवर, रेखा मोरे, चंद्रकांत भोई, अरुणा पावरा, रविंद्र गुरव कल्याणी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: School students' artwork in Taloda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.