शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून वाजणार शाळेची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 12:21 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. या अनुषंगाने ...

  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :   नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण ३६२ शाळा साेमवारी सुरू होण्याची चिन्हे असून शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांनुसार शाळांमध्ये उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेत शाळांच्या व्यवस्थापन समित्यांनी शाळा सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी उपाययोजना करण्यास संमती देत गती दिली होती. यांतर्गत गेल्या दोन दिवसात थर्मामीटर, ऑक्सीमीटर, थर्मल गन, जंतुनाशक, साबण खरेदी सुरू असल्याचे दिसून आले होते. बहुतांश ठिकाणी शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण व्यवस्था   करण्यात आली आहे. यात पालिका प्रशासनाची मदत घेत निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.  शाळा सुरू होणार असल्याने शाळेच्या दर्शनी भागावर शारिरीक अंतर, मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे इत्यादी संदर्भात मार्गदर्शक असणारे फलक लावले जात आहेत.  शाळेतील वर्गखोली तसेच स्टाफ रूम मधील बैठक व्यवस्था शारिरीक अंतराच्या नियमांनुसार करण्याचे आदेश असल्याने त्यादृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान एका बाकावर एक विद्यार्थी  बैठक व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकीकडे ही सर्व तयारी सुरू असताना शासनाकडून रात्रीतून निर्णय आल्यास बदल करण्याचीही तयारी शिक्षण विभागाकडून ठेवण्यात आली आहे. कनिष्ठ महाविद्यालय व शाळा सुरू होणार असल्याबाबत पालकांना मोबाईलद्वारे सूचित करण्यात येत असल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सोमवारी होणारी गर्दी टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती काही शाळांकडून देण्यात आली आहे. 

 जिल्ह्यात एकूण ८४ माध्यमिक तर ७८ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यातील एकूण १ लाख ९८ हजार विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार असल्याने या वर्गांमध्ये २४ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. बहुतांश विद्यार्थी ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून जोडले गेले असल्याची माहिती आहे.