राज्यभरात ‘ई-पॉस’चा तुटवडा

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: June 8, 2018 12:58 PM2018-06-08T12:58:18+5:302018-06-08T12:58:18+5:30

अनुदानित खत वितरण : कनेक्टीव्हीटीसाठी यंदा प्रथमच ‘हाय रेंज अॅन्टेना’

The scarcity of e-pauses across the state | राज्यभरात ‘ई-पॉस’चा तुटवडा

राज्यभरात ‘ई-पॉस’चा तुटवडा

Next
ठळक मुद्दे केवळ 23 हजार ‘ई-पॉस’ मशिन उपलब्ध अनुदानित खतांची वितरण हाय रेंज अॅन्टीने पॉस मशिन विक्री

संतोष सूर्यवंशी । 
नंदुरबार : शासनाच्या नवीन धोरणानुसार अनुदानित खतांचे वितरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘ई-पॉस’ मशिनचा संपूर्ण राज्यभरात तुटवडा निर्माण झाला आह़े त्यातच दुर्गम भागात ‘नेट कनेक्टीव्हीटी’ नसल्याने यंदाच्या खरिप हंगामात खतांचे वितरण करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आह़े
राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार सर्व अनुदानित खतांचे वितरण करण्यासाठी ‘ई-पॉस’ मशिनचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आह़े त्यानुसार अनुदानित खतांची वितरण करणा:या कृषि केंद्रांकडे ‘ई-पॉस’ मशिन असणे अनिवार्य करण्यात आले आह़े संपूर्ण राज्याचा विचार करता राज्यभरात साधारणत 30 कृषि केंद्रे आहेत़ त्यांच्या माध्यमातून अनुदानित खतांचे वितरण करण्यात येणार आह़े परंतु त्या तुलनेत केवळ 23 हजार ‘ई-पॉस’ मशिन उपलब्ध आहेत़ त्यामुळे अजून किमान सहा ते सात हजार ‘ई-पॉस’ मशिनचा पुरवठा होणे गरजेचा आह़े मागील वर्षापासून अनुदानित खतांचे वितरण ‘ई-पॉस’ मशिनच्या माध्यमातून करण्यात यावे असे नवीन धोरण शासनाकडून ठरविण्यात आले आह़े या वितरण प्रणालीमुळे खतांच्या विक्रीमध्ये होणारा काळाबाजार थांबण्यास मदत होणार असल्याने हा उत्तम निर्णय मानला जात आह़े परंतु ‘ई-पॉस’ मशिनला निर्माण होणा:या तांत्रिक अडचणी बघता यावर प्रशासनाकडून ‘मायक्रो स्टडी’ होणे गरजेचे आह़े मागच्या वर्षीचा अनुभव बघता अनेक ‘ई-पॉस’ मशिनला तांत्रिक अडचणींमुळे त्या निरुपयोगी ठरल्या होत्या़ त्यामुळे ऐनवेळी मशिन बंद पडल्यास प्रशासनाकडून कुठली पर्यायी व्यवस्था करण्यात येईल काय? असा प्रश्न यानिमित्ताने  निर्माण होत आह़े जिल्ह्यात यंदाच्या खरिप हंगामासाठी 94 हजार 90 मेट्रीक टन इतके खतांचे आवंटन झालेले आह़े तसेच 1 लाख 88 हजार खातेधारक शेतकरी आहेत़ सर्वत्र खरिप हंगामाची लगबग दिसून येत आह़े नंदुरबारसारख्या दुर्गम भागात ‘ई-पॉस’ मशिनचा वापर करुन खतांची विक्री करणे ‘कनेक्टीव्हीटी’ अभावी कठीण होत आह़े ‘ई-पॉस’ मशिनमुळे खतांचा काळा बाजार थांबण्यास मदत होणार असली तरी, यातील तांत्रिक अडथळे त्वरीत दुर व्हावेत अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आह़े
नंदुरबार, गडचिरोली, पालघर, गोंदीया, भंडारा आदी दुर्गम भागांमध्ये अनेक वेळा ई-पॉस मशिनला कनेक्टीव्हीटी मिळत नाही़ त्यामुळे मागील वर्षीसुध्दा खतांच्या विक्रीला मोठी अडचण निर्माण झाली होती़ त्यामुळे यंदा शासनाकडून ई-पॉस् मशिनची विक्री करण्या:या कंपन्यांमार्फत हाय रेंज अॅन्टीनाची उपलब्धता करुन देण्यात येईल़पॉस मशिनसोबतच एक अॅन्टीना देण्यात येत असतो़ परंतु अती दुर्गम भागात त्याला कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत असतात़ त्यामुळे शासनाकडून हाय रेंजचे अॅन्टीन्यांचा प्रथमच प्रयोग करण्यात येत आह़े
कृषि केंद्र चालकांना संबंधित हाय रेंज अॅन्टीने पॉस मशिन विक्री करणा:या कंपनीकडून उपलब्ध करुन घ्यावे लागणार आहेत़ सध्या 2.46 व्हजर्न असलेल्या ई-पॉस मशिन कंपन्यांकडून उपलब्ध करुन देण्यात आल्या आह़े राज्यात कृभको, व्हीजन टेक, आरपीएफ आदी 20 कंपन्यांकडून राज्यभरात  ई-पॉस मशिनचा पुरवठा करण्यात येत आह़े दरम्यान, वाय-फाय, जीपीआरएस, ब्रॉडबॅण्ड आदीं इंटरनेट कनेक्शनच्या माध्यमातून ई पॉस मशिनचा वापर करण्यात येणार आह़े
जिल्हानिहाय उपलब्ध ई-पॉस मशिन 
जळगाव 1 हजार 165, धुळे 499, नंदुरबार 160, अहमदनगर 1 हजार 278, अकोला 431, अमरावती 1 हजार 2, औरंगाबाद 1 हजार 99, बीड 1 हजार 124, भंडारा 539, बुलढाणा 741, चंद्रपुर 644, गडचिरोली 314, गोंदिया 551, हिंगोली 381, जालना 631, कोल्हापूर 1357, लातूर 588, नागपूर 925, नांदेड 906, उत्सामानाबाद 437, पालघर 172, परभणी 442, पुणे 989, रत्नागिरी 295, सांगली 948, सातारा 877, सिंधुदूर्ग 182, सोलापूर 984, ठाणे 125, वर्धा 575, वाशिम 317, यवतमाळ 1 हजार 116, नाशिक 1367, रायगड 242
 

Web Title: The scarcity of e-pauses across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.