शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी विरोध केलेल्या डांबरीकरणाचे काम अखेर उत्कृष्ट दर्जाचे झाल्याने समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

नवापूर : शहरातील प्रभाग क्रमांक सहा व सातमधील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चांगलेच चर्चेत आले होते. एकाच रस्त्याचे दोन वेळा ...

नवापूर : शहरातील प्रभाग क्रमांक सहा व सातमधील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चांगलेच चर्चेत आले होते. एकाच रस्त्याचे दोन वेळा उद्घाटन, सत्ताधारी व विरोधकांचे आरोप - प्रत्यारोप, सोशल मीडियावर डांबरीकरणाचे फोटो व व्हिडिओ व्हायरल, अशा कारणाने नवापूर शहरातील बहुचर्चित डांबरीकरणाचे काम अखेर नगरसेवक, पालिका प्रशासन व ठेकेदाराने चांगले करून दाखवले. यात खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय झाल्याचे दिसून येते. महानगरातील रस्त्यांना लाजवेल असा रस्ता नवापूर शहरात प्रथमच करण्यात आला आहे, असे रस्ते नेहमी तयार करण्यात यावे.

शहरातील प्रभाग सहा व सातमधील ५६ लाख रुपये खर्चाच्या ७५० मीटरच्या रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता. त्यामुळे हे काम बंद करण्यात आले. परंतु काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रखडलेले डांबरीकरणाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. यावेळी प्रभाग सहा व सातमधील डांबरीकरणाचे काम नागरिकांच्या मागणीनुसार स्थानिक नगरसेवकांच्या सूचनेप्रमाणे व प्रशासनाच्या हस्तक्षेपाने पूर्ण करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच नगर पालिकेच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील, शिवसेना नगरसेविका अरूणा पाटील, नगरसेवक तथा बांधकाम सभापती आरिफ बलेसरीया, सुरेखा जगदाळे, ठेकेदार चुन्नीलाल पाटील, नगरसेवक महेंद्र दुसाने यांचे स्थानिक नागरिकांनी आभार मानले.

नवापूर शहरात निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून अशा पद्धतीने रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांना विकासकामांचा ठेका देण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

नवनीत लोहार यांच्या घरापासून कुंभारवाडापर्यंत हा रस्ता वर्दळीचा व महत्वपूर्ण असल्यामुळे या रस्त्याचे काम चांगले गाजले होते. त्याचे राजकारणदेखील मोठ्या प्रमाणात झाले. नगर पालिका असो की ग्रामपंचायत परिसरातील नागरिक जागरूक राहिले तर कोणीही विकासकामे निकृष्ट दर्जाचे करू शकत नाही, याची प्रचिती या डांबरीकरण रस्त्यातून आली. आपल्या शहरात, गावात किंवा प्रभागात खराब विकास कामे होत असल्यास नागरिकांनी त्याला जोरदार विरोध करणे गरजेचे आहे. तरच दर्जेदार काम होईल अन्यथा काही दिवसात रस्ते उघडून त्याचा मनस्ताप नागरिकांनाच सहन करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विकासकामांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

नवापूर शहरात विकासात्मक कामे नगर पालिकाअंतर्गत केली जात आहेत. सर्वच कामे चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न नगर पालिका करीत आहे. साडेसहा कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांना आमदार शिरीष नाईक यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या अनुषंगाने नवापूर शहराचा विकास केला जाईल. तसेच शहरातील सर्वच रस्ते दर्जेदार केले जातील. - हेमलता पाटील, नगर पालिका, नगराध्यक्षा

नागरिकांचे समाधान हेच आमचे समाधान आहे.

छत्रपती शिवाजी रोड हा नागरिकांनी दिलेल्या सूचनेनुसार तयार करण्यात आला आहे. नागरिकांचे समाधान हेच आमचे समाधान आहे. प्रभाग क्रमांक सात व सहामधील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असून, पावसाळ्यात छतावरील पाणी रस्त्यावर पडून रस्ता खराब होऊ शकतो. त्या अनुषंगाने पाईप लावून छतावरील पाणी काढणे गरजेचे आहे. - अरूणा पाटील, शिवसेना नगरसेविका, नवापूर

नवापूर नगर पालिका शहरातील बांधकाम मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या प्रयत्नाने नवापूर शहरात विकासकामांना गती मिळाली आहे. मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जाणार आहेत. नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे प्रभाग सहामधील डांबरीकरण केले आहे. - आरिफ बलेसरीया, नगर पालिका बांधकाम सभापती

सुरूवातीला आमच्या प्रभागातील डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होते. त्या अनुषंगाने आम्ही नागरिकांनी विरोध केल्याने नगर पालिका प्रशासन, पदाधिकारी आणि ठेकेदार यांनी दखल घेऊन तत्काळ रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने केले. अशाच पद्धतीने नवापूर शहरातील सर्व रस्ते तयार करावे, जेणेकरून नागरिक व पालिका प्रशासनामध्ये संघर्ष होणार नाही. रस्ता चांगला केल्याने नगरसेवक आणि पालिका प्रशासनाचे आभार. - विजय लोहार, नागरिक नवापूर

नवापूर नगर पालिकेने ५६ लाखांच्या रस्त्याचे काम आम्हाला दिले होते. त्या अनुषंगाने रस्ता चांगला व दर्जेदार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जनहितार्थ काही वाढीव कामदेखील केले आहे. रस्त्यावर रेडियम पट्टे, रिफ्लेक्टर लाईट लावून चांगला रस्ता तयार करून दिल्याने नागरिक समाधानी आहेत. -चुनीलाल पाटील, ठेकेदार, नवापूर