शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सारंगखेडा : आरोपीवर कडक कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 11:59 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   सारंगखेडा येथील अल्पवयीन मुलीचा गळा चिरून खून करणाऱ्या आरोपीस आणि त्याला पाठीशी घालणाऱ्यांविरुद्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :   सारंगखेडा येथील अल्पवयीन मुलीचा गळा चिरून खून करणाऱ्या आरोपीस आणि त्याला पाठीशी घालणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. विशेष पोलीस महानिरिक्षक यांच्याशी आपले बोलणे झाले असल्याचे पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी सांगितले.सारंगखेडा येथील घटना निषेधार्ह आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी आपण नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिघावकर यांच्याशी आपले बोलणे झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा होईल. आरोपीस तात्काळ पोलीसांनी अटक केली आहे. आणखी कुणी यात सहभागी असतील तर त्यांचाही तपास करण्याचे आपण सांगितले आहे. रावेर, जि.जळगावची घटना आणि सारंगखेडाची घटना धक्कादायक आहे. या दोन्ही प्रकरणी आपण दिघावकर यांच्याशी बोललो असल्याचेही त्यांनी सांगितले. सारंगखेडा प्रकरणी विविध संघटना पुढे येऊन निषेध नोंदवीत आहेत. परंतु कायदा कुणीही हातात घेऊ नये असे आवाहन देखील पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी केले. जमावाविरुद्ध गुन्हाघटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी सारंगखेडा येथे विविध संघटनांनी काढलेल्या मोर्चा प्रसंगी दगडफेक व तोडफोड करणाऱ्या जमाविरुद्ध सारंगखेडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी जमावाने घरांची तोडफोड केली. त्यात सहा जणांच्या घराचे तसेच संसारोपयोगी सामानाची तोडफोड केली. त्यात त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय संशयीत आरोपीच्या घरावर देखील जमावाने चाल करून मोठ्या प्रमाणावर नुकसान केेले.याबाबत जमादार रमेश शिवराम पाटील यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने कोरोनाची साथ सुरू असतांनाही जमाव  जमवीने, तोंडाला मास्क किंवा   रुमाल न बांधता एकत्र येणे, अनधिकृतरित्या रॅली काढणे, जिल्हाधिकारी यांनी लागू केेलेल्या प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन    करणे, जनजीवन विस्कळीत करणे यासह इतर कलमान्वये    जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गावात तसेच घटनास्थळ परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.  नागरिकांनी शांतता ठेवावी व     कायदा हातात घेऊ नये असे   आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.