सारंगखेडा : आरोपीवर कडक कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 11:59 AM2020-10-27T11:59:36+5:302020-10-27T11:59:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   सारंगखेडा येथील अल्पवयीन मुलीचा गळा चिरून खून करणाऱ्या आरोपीस आणि त्याला पाठीशी घालणाऱ्यांविरुद्ध ...

Sarangkheda: Strict action will be taken against the accused | सारंगखेडा : आरोपीवर कडक कारवाई होणार

सारंगखेडा : आरोपीवर कडक कारवाई होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :   सारंगखेडा येथील अल्पवयीन मुलीचा गळा चिरून खून करणाऱ्या आरोपीस आणि त्याला पाठीशी घालणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. विशेष पोलीस महानिरिक्षक यांच्याशी आपले बोलणे झाले असल्याचे पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी सांगितले.
सारंगखेडा येथील घटना निषेधार्ह आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी आपण नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिघावकर यांच्याशी आपले बोलणे झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा होईल. आरोपीस तात्काळ पोलीसांनी अटक केली आहे. आणखी कुणी यात सहभागी असतील तर त्यांचाही तपास करण्याचे आपण सांगितले आहे. रावेर, जि.जळगावची घटना आणि सारंगखेडाची घटना धक्कादायक आहे. 
या दोन्ही प्रकरणी आपण दिघावकर यांच्याशी बोललो असल्याचेही त्यांनी सांगितले. सारंगखेडा प्रकरणी विविध संघटना पुढे येऊन निषेध नोंदवीत आहेत. परंतु कायदा कुणीही हातात घेऊ नये असे आवाहन देखील पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी केले. 
जमावाविरुद्ध गुन्हा
घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी सारंगखेडा येथे विविध संघटनांनी काढलेल्या मोर्चा प्रसंगी दगडफेक व तोडफोड करणाऱ्या जमाविरुद्ध सारंगखेडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
शनिवारी दुपारी हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी जमावाने घरांची तोडफोड केली. त्यात सहा जणांच्या घराचे तसेच संसारोपयोगी सामानाची तोडफोड केली. त्यात त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय संशयीत आरोपीच्या घरावर देखील जमावाने चाल करून मोठ्या प्रमाणावर नुकसान केेले.
याबाबत जमादार रमेश शिवराम पाटील यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने कोरोनाची साथ सुरू असतांनाही जमाव  जमवीने, तोंडाला मास्क किंवा   रुमाल न बांधता एकत्र येणे, अनधिकृतरित्या रॅली काढणे, जिल्हाधिकारी यांनी लागू केेलेल्या प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन    करणे, जनजीवन विस्कळीत करणे यासह इतर कलमान्वये    जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दरम्यान, गावात तसेच घटनास्थळ परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.  नागरिकांनी शांतता ठेवावी व     कायदा हातात घेऊ नये असे   आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. 

Web Title: Sarangkheda: Strict action will be taken against the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.