शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेड्यात दिव्यांग बंधूंच्या गायनातून कोरोनाची भिती झाली दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे दृष्टीहीन असलेल्या दिव्यांग बांधवांनी गीतांद्वारे कोरोनाची भिती दूर करत नागरिकांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे दृष्टीहीन असलेल्या दिव्यांग बांधवांनी गीतांद्वारे कोरोनाची भिती दूर करत नागरिकांना जनजागृतीचा प्रकाश देण्याचा अनोखा प्रयत्न केला़ मंगळवारी रात्री आठ वाजता सारंगखेडा गावाती मुख्य चौकात ही जनजागृती मैफल रंगली होती़धुळे येथील नेत्रहीन बहुउद्देशीय संघटनेच्या माध्यमातून एकत्र आलेले जयंत चव्हाण, अविनाश बागुल, बापू मराठे, विश्वनाथ सुतार, संजय बागुल हे एकत्र आले होते़ गायन, वादनाचा छंद असलेल्या या पाच जणांनी एकत्र येऊन सूर सितारा टीमची स्थापना केली आहे़ अंध असल्याने एकमेकांचा आधार घेत गावोगावी ते भटकंती करतात़ यात विशेष म्हणजे शासनाचे कोणतेही सहाय्य न घेत केवळ जनजागृतीचा वसा घेत हे पाचही जण फिरत आहे़ सध्या कोरोनाची दहशत वाढत असल्याने पाचही जणांनी धुळे व नंदुरबार जिल्हा पिंजून काढणे सुरु केले आहे़ यात मंगळवारी हे पथक सारंगखेड्यात दाखल झाले होते़ याठिकाणी गायक अविनाश बागुल व जयंत चव्हाण या दोघांनी विविध गीतांचे सादरीकरण उपस्थितांची मने जिंकून घेतली़ त्यांना ढोलकीवादक विश्वनाथ सुतार व संजय बागुल व आॅॅरगनवर बापू मराठे यांनी साथसंगत केली़ भारुडाच्या माध्यमातून कोरोनाची दहशत कमी करुन उपाययोजना काय असाव्यात याचा दंडक त्यांनी उपस्थितांना घालून दिला़ सुमुधूर अशा या जनजागृतीला नागरिकांनीही दाद या कलावंतांचे कौतूक केले़ माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपालसिंह रावल व नागरिकांनी त्यांचे कौतूक करत कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही दिली़या पथकाने आजवर तंटामुक्ती, दारुबंदी, स्वच्छ भारत अभियानासाठी स्वेच्छेने कार्य केले आहे़