श्रीराम मंदिर निधी संकलनासाठी प्रकाशा येथे संत संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:28 IST2021-01-18T04:28:36+5:302021-01-18T04:28:36+5:30

प्रकाशा : अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी निधी संकलन करण्याकरिता प्रकाशा येथील सद्‌गुरू धर्मशाळेत संत संमेलन झाले. या संमेलनाचे उद्‌घाटन ...

Sant Sammelan at Prakasha for Shriram Temple Fundraising | श्रीराम मंदिर निधी संकलनासाठी प्रकाशा येथे संत संमेलन

श्रीराम मंदिर निधी संकलनासाठी प्रकाशा येथे संत संमेलन

प्रकाशा : अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी निधी संकलन करण्याकरिता प्रकाशा येथील सद्‌गुरू धर्मशाळेत संत संमेलन झाले.

या संमेलनाचे उद्‌घाटन जितेंद्र महाराज पाडवी, ह. भ. प. खगेंद्र महाराज, ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज माळी, महंत श्री योगीदत्तनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाप्रमुख जत्र्या पावरा महाराज, जिल्हा संघचालक गुलाबसिंग वसावे, जिल्हा अभियानप्रमुख अजय कासार व जिल्ह्यातील विविध संप्रदायाचे संत-महंत उपस्थित होते. खगेंद्र महाराज म्हणाले की, निधी घेण्यासाठी गेलो असता प्रत्येकाने शब्द पाळावयाचे आहेत. ते म्हणजे मर्यादा ठेवा, दुसऱ्याचा आदर करा, सन्मान करा, नम्रता ठेवा, असे सांगितले. महंत योगीनाथदत्त महाराज, गुलाबसिंग वसावे यांनीही मार्गदर्शन केले. या संमेलनासाठी धोंडीराम शिनगार, पुरुषोत्तम काळे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री विजयराव सोनावणे, अभियान प्रमुख अजय कासार, अक्षय भावसार, अमोल पाठक आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Sant Sammelan at Prakasha for Shriram Temple Fundraising