संचारबंदी काळात दारू विक्री, एकाच व्यक्तीविरुद्ध दोन वेळा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:33 IST2021-04-23T04:33:07+5:302021-04-23T04:33:07+5:30

नंदुरबार : संचारबंदी काळात अवैध दारूविक्री प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एकाच व्यक्तीविरुद्ध एकदा विदेशी ...

Sale of alcohol during curfew, twice a crime against the same person | संचारबंदी काळात दारू विक्री, एकाच व्यक्तीविरुद्ध दोन वेळा गुन्हा

संचारबंदी काळात दारू विक्री, एकाच व्यक्तीविरुद्ध दोन वेळा गुन्हा

नंदुरबार : संचारबंदी काळात अवैध दारूविक्री प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एकाच व्यक्तीविरुद्ध एकदा विदेशी व एकदा देशी दारू घेऊन जाताना आढळून आल्याने तासाभराच्या अंतराने कारवाई करण्यात आलेली आहे.

पोलीस सूत्रांनुसार, संचारबंदीच्या काळात भावेश रतिलाल पगारे, रा.माळीवाडा, नंदुरबार हा २१ रोजी दुपारी साडेबारा वाजता बसस्थानक परिसरातील मुतारीच्या मागे लपून देशी दारू विक्री करीत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळून एक हजार ४० रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. याबाबत पोलीस कर्मचारी अनिल बडे यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला.

दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास हाच व्यक्ती रेल्वेस्थानक परिसरातील गौतम नगर भागात विदेशी दारूविक्री करतांना आढळून आला. त्याच्याजवळून तीन हजार ४८० रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली. पोलीस कर्मचारी विशाल मराठे यांनी फिर्याद दिल्याने भावेश पगारे याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार भटू धनगर व जगदीश पवार करीत आहेत.

Web Title: Sale of alcohol during curfew, twice a crime against the same person