शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पदभार घेतल्यानंतर सहा कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:27 IST

राज्यात उद्‌भवलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना राबवली जात आहे. तळोदा प्रकल्प कार्यालया ...

राज्यात उद्‌भवलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना राबवली जात आहे. तळोदा प्रकल्प कार्यालया अंतर्गत या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कामकाजाला गती देण्यात आली आहे. प्रकल्प कार्यालयात सुरु असणाऱ्या खावटीसंबधी ऑनलाईन फॉर्म भरणे, प्रकल्प अधिकारी लेव्हलला फॉर्म ॲप्रुव्हल करणे, फॉर्म संपादीत करणे इत्यादी कामांसाठी प्रकल्प कार्यालयाच्या आस्थापनेवर कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांना नियुक्ती करण्याचे आदेश व्हिडिओ कॉन्फरसींगद्वारे झालेल्या बैठकीत देण्यात आले होते. त्यानुसार प्रकल्प कार्यालयांकडून नियोजन करून तीन शिफ्ट कर्मचाऱ्यांची नियुक्ती नियुक्ती करण्यात आली होती. सकाळी सहा ते दोनच्या शिफ्टच्या कामात २५ तर दुपारी दोन ते रात्री १० साठी १८ कर्मचारी, रात्री १० ते सकाळी सहादरम्यान १३ कर्मचायांची नियुक्ती करण्यात आली होती. एका कर्मचाऱ्याला दिवसभरात ७०० फॉर्मचे उद्दिष्ट देण्यात आले होते. रात्रीच्या शिफ्ट असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिवसभरात ७०० फार्म करण्याची त्यांना सवलत देण्यात आली होती. या कामकाजासाठी नियुक्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी शुक्रवारी सहा कर्मचारी गैरहजर असल्याचे प्रकल्प अधिकारी मीना यांच्या लक्षात आले. गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एक दिवसाचे वेतन कपातीची कारवाई करण्याचे आदेश प्रकल्प अधिकारी विकास मीना यांनी बजावले आहेत. या कामात गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारची कारवाई केली जाईल, असे पूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. तरीदेखील कर्मचारी गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या दिवशी प्रकल्प अधिकारी विकास मीना यांनी धडक कारवाई करत प्रकल्प कार्यालयाच्या कामकाजात कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा व चालढकल सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.