शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

वनसंवर्धनसाठी दंडुका हाती घेत जैवविविधतेची समज देणाऱ्या रुषाबाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 22:03 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जंगलतोडीला लगाम घालण्यासाठी थेट पुरुषावर दंडुका उगारुन त्यांना जैवविविधेची समज देणाºया ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जंगलतोडीला लगाम घालण्यासाठी थेट पुरुषावर दंडुका उगारुन त्यांना जैवविविधेची समज देणाºया रुषाबाई वळवी ह्या आज संपूर्ण देशात ओळखल्या जात आहे़ वनउपज हाच उदरनिर्वाहाचा भाग असून त्यातून रोजगारनिर्मितीही होऊ शकते, या सोप्या तत्त्वज्ञानाने जंगल संवर्धनासाठी कार्य करणाºया रुषाबाई ह्या आगळे वेगळे व्यक्तीमत्त्व ठरतात़भगदारी येथे जन्मलेल्या रुषाबार्इंचे शिक्षण हे आठवीपर्यंत झाले आहे़ १९८९ साली त्यांचा विवाह कंजाला ता़ अक्कलकुवा येथील जैवविविधता संवर्धनासाठी कार्य करणारे रामसिंग वळवी यांच्यासोबत झाल्यानंतर दोघांनी मिळून वनसंपदेसोबत निगडीत असलेले अन्नपदार्थ, रानभाज्या आणि औषधी वनस्पतींचे संकलन करुन कंजाला हे गाव राष्ट्रीय पातळीवर आणले होते़ एक महिला म्हणून रुषाबार्इंनी ३१ वर्षांपासून जैवविविधता संवर्धनासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे़ यात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी शबरी महिला बचत गट व शबरी महिला ग्राम सेवा संघाची स्थापना करुन २५० पेक्षा अधिक महिला जोडून घेतल्या आहेत़ यातून परसबाग, कुकुटपालन, पळसाच्या चहा- आवळा कॅन्डीची निर्मिती, अंगणवाडी व पोषण आहार या सगळ्याचा फायदा सभासद महिलांना झाला होता़४आधुनिक विकास वाढत असताना सातपुड्यात परंपरागत ज्ञानाच्या व मौखिक ज्ञान परंपरेच्या प्रवाहातून रोजगारनिर्मिती करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे़ कृषी विज्ञान केंद्र व योजक अशा विविध संस्थांच्या सोबतीने काम करणाºया रुषाबाई यांनी जंगलातील रानभाज्यांचे, त्यांच्या वापराचे, औषधी गुणधमार्चे मौखिक ज्ञान लिखित स्वरूपात आणून ते जगापर्यंत पोहोचवले आहे़ परिसरातील महिला आणि विविध विषय तज्ञांच्या मदतीतून कंजाला परिसरातील रानभाज्यांच्या पहिल्या पुस्तकाची निर्मिती करुन सातपुड्यातील रानभाज्या त्यांनी देशपटलावर आणल्या होत्या़ कधीही शाळेत न गेलेल्या महिलांच्या ज्ञानावर आधारित यापुस्तकाचे प्रकाशन गेल्यावर्षी राज्यपालांच्या हस्ते केले गेले़४परिसर विकासासाठी योगदान देणे सुरु असताना त्यांनी परिसराच्या विकासासाठी पुणे येथील यशदा, बीआरजीएफ तसेच दिल्ली मुक्त विद्यापीठातून फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगांचे प्रशिक्षण पूर्ण केले. राहुरी कृषी विद्यापीठ येथून औषधी व सुगंधी वनस्पती लागवड प्रशिक्षण पूर्ण केले.४कंजाला गाव हे वर्षानुवर्षै जंगल राखणारं गाव आहे़ परंतू आजूबाजूचे जंगल तुटल्याने इतर गावातील लोक कंजालाचे जंगल तोडायला लागले यातून संघर्ष निर्माण झाला़ यावर तोडगा म्हणून रुषाबाई आणि महिलांनी दंडुका पथक तयार करुन वृक्ष तोड करणाऱ्यांना रोखायला सुरुवात केली़ महिलांच्या या धाडसी वृत्तीमुळे जंगलतोड करु पाहणारे पळ काढू लागले़ आजघडीस संस्थेच्या माध्यमातून आमचूर, मोहा, सीताफळ यावर आधारित छोटे व्यवसाय सुरु करत घराघरात कुपोषण कमी करण्यासाठी परसबागा व पौष्टिक अन्नपदार्थ निर्मितीची चळवळ उभारली आहे़