शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनऐवजी नियमांची अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन ...

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन होत असल्याने अनेकांचा रोजगार हातून गेला आहे. नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या कोरोेनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने उपाययोजनांच्या दृष्टीने नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. वर्षभरापासून लॉकडाऊन होत असल्याने अनेकांच्या डोक्यावर बँकांंचे गृहकर्ज, पॉलिसी असे विविध हप्ते थकीत झाले आहेत. तसेच बहुतांश नागरिक व दुकानदार हे भाडेतत्त्वाच्या घरांसह दुकाने असूून लॉकडाऊनमध्ये व्यवहार बंद राहिल्यास भाडे द्यावे कुठून असाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच महागाईमध्ये भरमसाठ वाढ होत असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत. सहा महिन्यांपासून आर्थिक व्यवहार पूर्ववत होेत असताना आता पुन्हा कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लावण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी नियमांची अंमलबजावणी करण्याऐवजी लॉकडाऊन लावण्यात येत असल्याने रोेजंदारी करून उदरनिर्वाह करणार्‍यांंना पोटाची खळगी भरण्याची चिंता सतावत आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार बंद झाल्यास अनेकांचा रोजगार बुडणार असून पुन्हा आर्थिक घडी विस्कळीत होईल. प्रशासनाने लॉकडाऊन काळात सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा दिली असली तरी त्यानंतरचा लॉकडाऊन लावणे हा पर्याय नाही. म्हणून लहान-मोठे व्यवसाय करणार्‍यांचा विचार करून लॉकडाऊनऐवजी कोरोना नियंत्रणासाठी नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी. कोरोेनाला रोखण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन हे महत्त्वाचे असल्याने शहरासह जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी या नियमांची अंमलबजावणी होत आहे की नाही? याबाबत सर्वेक्षणासाठी पथके नियुक्त करावीत. तसेच परिस्थितीचा विचार करुन लॉकडाऊन रद्द करण्यात यावा, अशी मागणी नंदुरबार येथील सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान, हाजी असलम पिंजारी, इरफान हसन खाटीक, अ‍ॅड. इम्रान याकुब पिंजारी यांनी निवेदनातून केली आहे.