उंटावद येथे रोकडमल हनुमानाचा यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:50 PM2019-11-10T12:50:02+5:302019-11-10T12:50:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गोमाई व सुसरी नदीच्या संगमस्थळी असलेल्या उंटावद, ता.शहादा येथील रोकडमल हनुमानाची यात्रा 11 नोव्हेंबरपासून ...

Rokdmal Hanuman Yatra at Untavad | उंटावद येथे रोकडमल हनुमानाचा यात्रोत्सव

उंटावद येथे रोकडमल हनुमानाचा यात्रोत्सव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : गोमाई व सुसरी नदीच्या संगमस्थळी असलेल्या उंटावद, ता.शहादा येथील रोकडमल हनुमानाची यात्रा 11 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने येणा:या भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापनाने सुविधा उपलब्ध करून जय्यत तयारी केली असल्याची ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी दिली.
यासंदर्भात माहिती देतांना त्यांनी सांगितले की, रोकडमल हनुमान मंदिर देवस्थान उंटावद ग्रामपंचायत तसेच मंदिर ट्रस्टी भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी सतत तत्पर असतात. सुमारे 200 वर्षापूर्वी गोमाई नदीच्या पुरात वाहून वाहून आलेल्या हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना ग्रामस्थांनी केली होती. परिसरातील जागृत देवस्थान म्हणून उंटावद येथील मंदिर परिसरात प्रसिद्ध आहे. भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणा:या हनुमानाचे जागृत देवस्थान असल्याने दर शनिवारी भक्तांची दर्शनासाठी गर्दी होते. नवसाला पावणारा हनुमान म्हणून येथील देवस्थानाची प्रसिद्धी असून, येथे साखर, केळी तुला करून  रोडग्याचा महाप्रसाददेखील वाटप केला जातो.
परिसरातील भक्तगण याठिकाणी मोठय़ा संख्येने दर्शनासाठी येत असून, उंटावद ग्रामस्थांनी मंदिराच्या देखरेखीसाठी व व्यवस्थापनेसाठी ट्रस्टची स्थापना केली आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार सात वर्षापूर्वी करण्यात आला असून, मुख्यमूर्ती जागेवरून न हलविता मंदिराचा विस्तार करण्यात आला आहे. मंदिराची उंची सुमारे 51 फूट असून, 50 बाय 40 फुट असे दोन हजार चौरस फुटाचे आकर्षक व भव्य मंदिराची दक्षिणात्य पद्धतीने उभारणी करण्यात आली आहे. मंदिराजवळ भक्तनिवास आणि धर्मशाळा बांधण्यात आली आहे. मंदिराच्या सभोवताली बगीचा तयार करण्यात आला असून, जिल्हा परिषदेच्या निधीतून मंदिर परिसरात संरक्षक भिंत व काँक्रिटीकरणाचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या वर्षी वैकुंठ चतुर्दशीला भरणा:या यात्रेसाठी मंदिर परिसरातील साफ सफाई व अन्य कामांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष गोपाळ पाटील यांनी दिली.
रोकडमल हनुमान मंदिर ट्रस्टच्या नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष सुभाष गोपाळ पाटील, उपाध्यक्ष अजय काशिनाथ पाटील, सचिव प्रकाश सुभाष पाटील, खजिनदार चंद्रकांत लिमजी पाटील, विश्वस्त सुरेश गोपाळ पाटील, संदीप उद्धव पाटील, काशिनाथ धारू पाटील, सुनीध रमण पाटील, काशिनाथ ङिापरू पाटील, देविदास बुला पाटील, रामचंद्र राजाराम पाटील, हेमंत रामदास पाटील, विलास उद्धव पाटील असल्याची माहिती ट्रस्टींद्वारे देण्यात आली. तसेच आमदार निधीतून शहादा येथून येण्यासाठी पुलाचे बाधकाम सुरू आहे.

Web Title: Rokdmal Hanuman Yatra at Untavad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.