शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

उंटावदची ग्रामदेवता रोकडमल हनुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST

या मंदिराबद्दल जुण्याजाणत्या लोकांकडून अशी माहिती मिळते की, सुमारे ८०-८५ वर्षांपूर्वी गोमाई नदीपात्रात सुमारे ५-५.५ फूट उंचीची रोकडमल हनुमानची ...

या मंदिराबद्दल जुण्याजाणत्या लोकांकडून अशी माहिती मिळते की, सुमारे ८०-८५ वर्षांपूर्वी गोमाई नदीपात्रात सुमारे ५-५.५ फूट उंचीची रोकडमल हनुमानची मूर्ती ग्रामस्थांना सापडली होती. या मूर्तीने एका ग्रामस्थांच्या स्वप्नात येऊन गोमाईकाठी मंदिर उभारून माझी स्थापना कर असे सांगितल्याने ग्रामस्थांनी नदीजवळच एक छोटे पत्र्याचे शेड उभारून मूर्तीची विधिवत स्थापना केली. त्यानंतर रोकडमल हनुमानच्या आशीर्वादाने उंटावदचे नशीबच पालटल्याने या मंदिराला ग्रामदेवता म्हणून मान्यता मिळाली. हळू हळू रोकडमल हनुमानाची किर्ती परिसरात पसरून लागल्याने हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली. भाविकांची संख्या पाहता मंदिराच्या देखरेखीसाठी उंटावद ग्रामस्थांनी एक ट्रस्टची स्थापना केली. व या ट्रस्ट तर्फे पत्र्याचे शेड काढून मंदिराची उभारणी तसेच भाविकांसाठी धर्मशाळा बांधण्यात आली. मंदिराचा हा परिसरही छोटा पडू लागल्याने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. पुरातन छोट्याशा मंदिराच्या जागेवर भव्यदिव्य असे मंदिर उभारण्यात आले. आज मितीस या मंदिराची पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून ख्याती आहे.

दरवर्षी येथे वैकुंठ चतुर्दशीला यात्रा भरते. दर शनिवारी तसेच सोमवती अमावस्येला येथे दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते. येथे छोटेसे शनी मंदिरही असून मंदिर परिसर निसर्गरम्य आहे. असंख्य भाविक येथे नवस करण्यासाठी आणि नवस पूर्ण झाल्यावर नवस फेडण्यासाठी येतात. मंदिर ट्रस्ट तर्फे मंदिराची देखभाल व पूजाअर्चा केली जाते.

शहादा शहरातील खोलगल्लीत देखील सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीचे हनुमान मंदिर आहे तसेच कुकडेल उतरतीवर देखील एक पुरातन छोटेसे हनुमान मंदिर आहे. या मंदिराला कुकडेलचे ग्रामदैवत म्हणून मान्यता आहे. याशिवाय दोंडाईचा रोडलगत सुमारे दीडशे वर्षाचे श्री प्रेस मारूतीचे पुरातन मंदिर आहे. दरवर्षी विजया दशमी ( दसरा) येथे नागरिक सीमोल्लंघनासाठी एकत्र येतात. शहादा बसस्थानकासमोर देखील अलिकडेच उभारण्यात आलेले सुंदर हनुमान मंदिर आहे. येथे पूर्वी पुरातन छोटेसे मंदिर होते. याशिवाय तालुक्यात अनेक ठिकाणी हनुमान मंदिरे असून सर्व मंदिरावर मोठ्या उत्साहात दरवर्षी हनुमान जयंती उत्सव साजरा केला जातो.

कोरोनाच्या महामारीमुळे सध्या सर्व देवस्थाने बंद आहेत. केवळ पूजाऱ्यांतर्फे नित्य पूजाअर्चा केली जाते. त्यामुळे यंदा हनुमान जयंतीस हनुमान भक्तांना बजरंगबलीचे दर्शनही होणार नाही. हनुमान जयंतीस श्री रोकडमल हनुमान मंदिर व शहरातील सर्व हनुमान मंदिरात केवळ पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हनुमान चालिसा व पूजापाठ करण्यात येणार आहे.