शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

वैजाली ते प्रकाशा रस्त्याची काथर्दे फाट्यापर्यंत दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:31 IST

शहादा : तालुक्यातील वैजाली ते प्रकाशा रस्त्याची काथर्दे दिगर फाट्यापर्यंत दुरवस्था झालेली असून, रस्त्यात खड्डे का खड्ड्यांत रस्ता असा ...

शहादा : तालुक्यातील वैजाली ते प्रकाशा रस्त्याची काथर्दे दिगर फाट्यापर्यंत दुरवस्था झालेली असून, रस्त्यात खड्डे का खड्ड्यांत रस्ता असा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित लोकप्रतिनिधी यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून, नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या वर्षभरापासून या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली असून, रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडले असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना मोठी कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. परिणामी अनेक वाहनांचे नुकसानही झाले असून, नागरिकांनाही पाठीच्या मणक्यांसह व इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याने सातपुड्यातील २५ गावांतील नागरिकांचा जिल्ह्याच्या मुख्यालयाशी रोजचा संपर्क येत असल्याने या मार्गावर वाहनांची रहदारी असते. तसेच उसाच्या गाळप हंगामात उसाची वाहने व अवजड वाहनांचीही या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असल्याने या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित लोकप्रतिनिधी यांना प्रत्यक्ष भेटून, निवेदन देऊनही कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वैजाली-प्रकाशा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी व येत्या एक महिन्याच्या आत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहादा येथील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वैजाली, नांदर्डे, सोनवल, कलमाडी, आदी गावांतील ग्रामस्थांनी दिला आहे.