तोरणमाळ येथे साधेपणाने गुरू गोरक्षनाथ मंदिरात धार्मिक विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST2021-03-13T04:55:48+5:302021-03-13T04:55:48+5:30

तोरणमाळ येथे भगवान गोरक्षनाथांचा यात्रोत्सवात मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील हजारो भाविक दर्शन तसेच नवस भेडण्यासाठी दरवर्षी येतात. ...

Ritual at Guru Goraksanath Temple at Toranmal | तोरणमाळ येथे साधेपणाने गुरू गोरक्षनाथ मंदिरात धार्मिक विधी

तोरणमाळ येथे साधेपणाने गुरू गोरक्षनाथ मंदिरात धार्मिक विधी

तोरणमाळ येथे भगवान गोरक्षनाथांचा यात्रोत्सवात मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील हजारो भाविक दर्शन तसेच नवस भेडण्यासाठी दरवर्षी येतात. या ठिकाणी मध्य प्रदेशातील निमाड भागातील भक्तगण रात्र मुक्कामी राहून जागरण करतात व नैवेद्य तयार करून प्रसाद स्वरूपात वाटप करतात. यात्रेत विविध प्रकारच्या साहित्याचीही विक्री होते. यात भांडी, घरगृती वस्तू संस्कृतिक दागदागिने यांची मोठी विक्री हाेते. यात्रोत्सवात एकरंगी पेहराव करत भाविक हजेरी लावत असल्याने यात्रोत्सवात चैतन्य निर्माण होत होते. परंतु कोरोनामुळे यंदा हा यात्रोत्सव रद्द करण्यात आला असल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

महाशिवरात्रीनिमित्त महंत संजूनाथ महाराज व पोलीस पाटील ओलसिंग नाईक यांच्या हस्ते विधिवत ध्वज पूजन करण्यात येऊन यात्रोत्सवाच्या धार्मिक विधींना प्रारंभ करण्यात आला. गुरू गोरक्षनाथ यांचे दर्शन घेण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत भाविक हजर झाले हाेते. गुरुवारी सकाळी नियमांचे पालन करुन गोरक्षनाथ यांच्या पालखीचे बाजारपेठेतून शोभायात्रा काढण्यात आली. मुख्य मंदिरात मिरवणुकीची समाप्ती होऊन रोट प्रसादाची तयारी सुरू झाली. सव्वा मणाचा रोडगा पांढ-या कपड्यात गुंडाळून धगधगत्या गौरीहारमध्ये टाकण्यात येणार आहे. नंतर बाहेर काढून प्रसाद वाटपाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

कोरोनामुळे यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. या ठिकाणी बाहेरून भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता यावेळी पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी, अर्चना शिंदे, घनश्याम सूर्यवंशी, सिद्धार्थ सुलवाडे, तोरणमाळ दूरक्षेत्रचे चंदू साबळे, दिलीप सूर्यवंशी, छोटूलाल पावरा आदी या ठिकाणी उपस्थित होते.

Web Title: Ritual at Guru Goraksanath Temple at Toranmal