शहादा तालुक्याची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:31 IST2021-07-28T04:31:53+5:302021-07-28T04:31:53+5:30

शहादा तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक व संबंधित अधिकारी यांची आढावा बैठक लोणखेडा येथे पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या सभागृहात ...

Review meeting of Shahada taluka | शहादा तालुक्याची आढावा बैठक

शहादा तालुक्याची आढावा बैठक

शहादा तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक व संबंधित अधिकारी यांची आढावा बैठक लोणखेडा येथे पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या सभागृहात घेण्यात आली. आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, गटविकास अधिकारी रघुवेंद्र घोरपडे, भाजपचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, जि.प.चे माजी सदस्य सुनील चव्हाण, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील व ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. यावेळी आमदार पाडवी यांनी ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडून ग्रामीण भागातील येणार्‍या अडचणी समजून घेतल्या. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा यांना सूचना करीत केंद्र सरकारची ‘हर घर नल हर घर जल’ या योजनेसंदर्भात नवीन आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: Review meeting of Shahada taluka