शहादा येथे आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:32 IST2021-07-28T04:32:15+5:302021-07-28T04:32:15+5:30

शहादा-तळोदा विधानसभा मतदार संघातील शहादा तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवकांसह सर्व संबंधित अधिकारी यांची आढावा बैठक लोणखेडा, ता. शहादा येथील पूज्य ...

Review meeting at Shahada | शहादा येथे आढावा बैठक

शहादा येथे आढावा बैठक

शहादा-तळोदा विधानसभा मतदार संघातील शहादा तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवकांसह सर्व संबंधित अधिकारी यांची आढावा बैठक लोणखेडा, ता. शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या महात्मा गांधी सभागृहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी होते. यावेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, पंचायत समिती सभापती बायजाबाई भिल, उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, गटविकास अधिकारी रघुवेंद्र घोरपडे आदी उपस्थित होते.

तालुक्यातील सरपंच-उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडून ग्रामीण भागातील येणार्‍या अडचणी समजून घेत आमदार पाडवी व दीपक पाटील यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. समाधानकारक व पुरेशी माहिती न देणाऱ्या तलाठी व ग्रामसेवकांसह संबंधित खात्याच्या कर्मचाऱ्यांना कडक शब्दांत सूचना करण्यात आली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष सूचना करीत केंद्र सरकारने नवीन राबवलेली योजना ‘हर घर नल- हर घर जल’ यासंदर्भात नवीन आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मतदार संघातील शेतकऱ्यांना येत असलेल्या वीज वितरण कंपनीच्या अडचणी सोडविण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या‌. आपत्ती व्यवस्थापन तत्पर ठेवण्यात यावे, अशी सूचना दिली.

प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी केले. सूत्रसंचालन शरद पाटील यांनी तर आभार गटविकास अधिकारी रघुवेंद्र घोरपडे यांनी मानले. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील चव्हाण, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, गोविंद पटले, वीरसिंग पाडवी, प्रवीण वळवी, हेमराज पवार यांच्यासह संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Review meeting at Shahada