सारंगखेडा येथे कोरोनासंदर्भात आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST2021-04-09T04:32:21+5:302021-04-09T04:32:21+5:30

बैठकीला तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, सरपंच पृथ्वीराज रावल, सारंगखेडा प्राथमिक ...

Review meeting regarding corona at Sarangkheda | सारंगखेडा येथे कोरोनासंदर्भात आढावा बैठक

सारंगखेडा येथे कोरोनासंदर्भात आढावा बैठक

बैठकीला तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, सरपंच पृथ्वीराज रावल, सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी.एम. पाटील, आरोग्य सहायक महिरे, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, मंडळाधिकारी जुबेर पठाण, तलाठी एस.एन. डिगराळे आदी उपस्थित होते.

या वेळी प्रांताधिकारी डाॅ. गिरासे यांनी आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाला खबरदारीच्या सूचना करीत पॉझिटिव्ह रुग्णांशी संपर्क करून त्यांना आरोग्य सेवा देऊन गंभीर लक्षणे असलेल्यांना त्वरित उपचार द्यावा व ज्यांना गंभीर लक्षणे नाहीत अशांना होम क्वारंटाईन करावे. शनिवार व रविवार या दोन दिवशी सारंगखेडा येथील किराणा दुकानदार, दुकानावर काम करणारे कर्मचारी, पानटपरी चालक, फळे, भाजीपाला, दूध विक्रेते, मेडिकल स्टोअर्स चालक, शेतीविषयक खते, औषधे, बियाणे व शेती साहित्याची दुकाने इतर सर्व दुकानदारांच्या व दुकानावर काम करणार-या कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याची सूचना आरोग्य विभागाला देण्यात आली. तसेच लसीकरणाबाबत जनजागृती करण्याची सूचनाही डाॅ. गिरासे यांनी दिली. गुरुवार ते सोमवार सकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांना कडक सूचना देऊन लाॅकडाऊनचे पालन करण्यासंदर्भात आवाहन करावे. जनतेनेही परिस्थिती पाहता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. गिरासे व डॉ. कुलकर्णी यांनी केले.

वैद्यकीय अधिकारी डाॅ. पावरा पावरा यांनी अपूर्ण कर्मचारी असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याचे प्रांताधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर प्रांताधिकाऱ्यांनी कर्मचारी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर अधिग्रहित केलेल्या जि.प. शाळा व व माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी संपूर्ण गावात सर्वेक्षण स्क्रीनिंग त्याचबरोबर लसीकरणासंदर्भात घरोघरी जाऊन नागरिकांना त्याचे महत्त्व पटवून द्यावे व जनजागृती करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी दत्त मंदिरावरील हॉल विलगीकरण कक्ष म्हणून उपलब्ध करून देऊ, असे सांगितले.

Web Title: Review meeting regarding corona at Sarangkheda