शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोच्या फळबाग लागवडीला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST

शेतीच्या उत्पादनात वाढ करणे, पारंपरिक पिकांबरोबरच फळबाग लागवडीखालील क्षेत्रफळात वाढ करणे, फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे आदी उद्देशातून रोहयो ...

शेतीच्या उत्पादनात वाढ करणे, पारंपरिक पिकांबरोबरच फळबाग लागवडीखालील क्षेत्रफळात वाढ करणे, फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे आदी उद्देशातून रोहयो अंतर्गत फळबाग लागवड केली जाते. २०२०-२१ या वर्षात शहादा तालुक्यातील ४८० हेक्टर क्षेत्रफळावर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात आतापर्यंत ४२१ शेतकरी तसेच ४१८.४९ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. यापैकी ५६३.०३ हेक्टर क्षेत्रावरील लागवड प्रस्तावाला तांत्रिक तर ५६३.०३ हेक्टरवरील प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यात ४२१ शेतकऱ्यांनी ४१८.४९ हेक्टरवर फळबाग लागवड केली. आंबा कलमे, काजू, चिकू कलमे, पेरू कलमे, डाळिंब कलमे, आंबा रोपे, मोसंबी, लिंबू, चिंच रोपे, सीताफळ रोपे, आवळा रोपे, बोर रोपे, बांबू रोपे, औषधी वनस्पती आदी फळ लागवडीचा समावेश आहे. शहादा तालुक्यात सर्वाधिक पसंती आंबा कलमाला दिली आहे. त्यात २६९ शेतकऱ्यांनी लाभ घेतला तर पेरू कलमासाठी ४३ शेतकरी, कागदी लिंबू ७४ शेतकरी, सीताफळ रोपे २५ शेतकरी, बांबू रोपे चार शेतकऱ्यांनी लाभ घेतला.

मंडळनिहाय उद्दिष्टे

शहादा तालुक्यात एकूण चार मंडळ आहेत. त्यात शहादा मंडळाला १२० हेक्टर फळलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात ६०.२८ हेक्टर फळबाग लागवड करण्यात आली. म्हसावद मंडळात १२० हेक्टर उद्दिष्टापैकी १०५.७२ हेक्टर लागवड करण्यात आले. मंदाणे मंडळात १२० हेक्टरपैकी अधिकची १४६.४२ लागवड करण्यात आली. कळंबू मंडळात १२० हेक्टरपैकी १०४.०७ हेक्टर फळबाग लागवड करण्यात आल्याची माहिती शहादा तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे यांनी दिली.

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच फळबाग लागवडीकडे वळावे. जेणेकरून आर्थिक उत्पन्नात दुसरा शोध तयार करता येईल. मागील वर्षी २०१ हेक्टर उद्दिष्ट देण्यात आले होते. त्याहून अधिक २२७ हेक्टर फळबाग लागवड करण्यात आली होती. यावर्षी ४८० हेक्टर उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून फळबागेचे महत्त्व पटवून उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यात आला आहे.

-किशोर हडपे, तालुका कृषी अधिकारी, शहादा.