शहादा शहर हरित करण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:33 IST2021-05-20T04:33:23+5:302021-05-20T04:33:23+5:30

बैठकीत चळवळीला मूर्त रूप हरित शहादाची संकल्पना व रूपरेषा ठरवून विधायक चळवळीला मूर्त रूप देण्यासाठी शहाद्यातील सर्व सेवाभावी व ...

Resolution to make Shahada city green | शहादा शहर हरित करण्याचा संकल्प

शहादा शहर हरित करण्याचा संकल्प

बैठकीत चळवळीला मूर्त रूप

हरित शहादाची संकल्पना व रूपरेषा ठरवून विधायक चळवळीला मूर्त रूप देण्यासाठी शहाद्यातील सर्व सेवाभावी व समाज संस्था, सर्व सामाजिक संघटना, अस्थापना व मंडळे, सांस्कृतिक व शैक्षणिक समविचारी संस्था, विविध गणेश मंडळे आदी संस्थांचे सर्व सदस्य, पदाधिकारी व पर्यावरण प्रेमी, वृक्ष प्रेमी, सुजाण नागरिकांना २१ मे रोजी गांधी पार्क येथे उपस्थित राहण्याचे आवाहन नियोजन समितीने केले आहे.

स्वयंस्फूर्त चळवळीचे प्रवर्तक

हरित, सुंदर व स्वच्छ शहादाच्या चळवळीचे प्रवर्तक म्हणून प्रदीप पाटील, प्रा. ज्ञानी कुलकर्णी, माधव पाटील (लांबोळेकर), विनोद शंकर सोनार, ज्ञानेश्वर चौधरी, गुरू राजपाल, सतीश साळी, प्रा.अनिल सोलंकी, उदय निकुंभ, अतिन पटेल, चंद्रकात शिवदे, विवेक भावसार आदी सामाजिक कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. सदरच्या बैठकस्थळी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात येणार असल्याने सर्वांनी मास्क लावून येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Resolution to make Shahada city green