शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

‘रेस्क्यू’ ऑपरेशन करणा:या वनकर्मचा:यावर माकडाचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पिसाळलेल्या माकडाने केलेल्या हल्ल्यात वनरक्षक जखमी झाल्याची घटना नंदुरबारात घडली़ शुक्रवारी डुबकेश्वर महादेव मंदिर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पिसाळलेल्या माकडाने केलेल्या हल्ल्यात वनरक्षक जखमी झाल्याची घटना नंदुरबारात घडली़ शुक्रवारी डुबकेश्वर महादेव मंदिर परिसरातून माकडास पकडून वन कर्मचारी वनक्षेत्रात सोडत असताना पिंज:यातून बाहेर पडलेल्या माकडाने कर्मचा:याला चावा घेत हल्ला केला़    अरविंद निकम असे जखमी वनरक्षकाचे नाव असून ते चाकळे ता़ नंदुरबार येथे नियुक्त आहेत़ शुक्रवारी होळ तर्फे हवेली शिवारातील डुबकेश्वर महादेव मंदिर परिसरात माकड पिसाळल्याने मंदिरात दर्शनासाठी येणा:यांवर हल्ला केल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती़ त्यानुसार सहायक वनसंरक्षक जी़आऱरणदिवे यांच्या मार्गदर्शनात वन कर्मचा:यांच्या पथकाने याठिकाणी शुक्रवारी सकाळी भेट देत छोटा पिंजरा लावून सुमारे चार तासांच्या मेहनतीनंतर माकडाला ताब्यात घेतले होत़े वनरक्षकांचे पथक त्यास नंदुरबार तालुक्यातील वनक्षेत्रात सोडण्यासाठी जात असताना   अचानक माकड पिसाळून बाहेर आल़े यावेळी वनरक्षक अरविंद निकम यांनी त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, यात त्यांच्या हात आणि पायाला चावा घेत अंगावर नखांनी हल्ला करत जखमी केल़े जखमी झाल्यानंतरही त्यांनी माकडाला पकडून पिंज:यात टाकल़़े काही वेळाने कर्मचा:यांनी  माकडाला पिंज:याबाहेर काढून वनक्षेत्रात सोडले परंतू माकड पुन्हा पिंज:यात जाऊन बसले होत़े सायंकाळी उशिरा त्याला पुन्हा वनक्षेत्रात सोडून देण्यात आल़े दरम्यान घटनेत जखमी झालेले वनरक्षक निकम यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़  पिसाळलेल्या माकडाला बेशुद्ध करुन पकडण्यासाठी वनविभागाने पशुवैद्यकीय विभागाला कळवले होत़े परंतू त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे प्रतिसाद न दिल्याने वनकर्मचा:यांनी धोका पत्करुन त्याला पकडल़े वनविभागाच्या कर्मचा:यावर प्राण्याने हल्ला करण्याची ही चौथी घटना आह़े जखमी कर्मचा:यांना शासनाकडून मदत देण्याची अपेक्षा व्यक्त होत आह़े