जिल्ह्यात ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, १० जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 09:55 PM2020-06-28T21:55:50+5:302020-06-28T21:56:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रविवारी ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर १० जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. ...

Report of 6 persons in the district is positive, 10 persons are corona free | जिल्ह्यात ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, १० जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, १० जण कोरोनामुक्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रविवारी ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर १० जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात एकुण रुग्णसंख्या आता १६३ झाली आहे.
रविवारी आढळून आलेल्या सहा नवीन रुग्णांमध्ये नंदुरबार शहरातील तीन, धुळवद, ता.नंदुरबार, तळोदा व शहादा येथील प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे. नंदुरबार शहरात कोकणी हिल परिसरातील साईबाबा नगर येथील ३७ वर्षीय महिला, सिद्धी विनायक चौक मंगळबाजार परिसरातील २८ वर्षीय महिला, वृंदावन कॉलनी येथील ५० वर्षीय महिला, धुळवद ता़ नंदुरबार येथील ४७ वर्षीय पुरुष, तळोदा येथील खान्देशी गल्लीतील ५३ वर्षीय पुरुष तर शहादा शहरातील गणेश नगरातील ४२ वर्षीय पुरुष अशा सहा जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ रविवारी २९ जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत़
याशिवाय १० जण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. त्यात नंदुरबारातील एक तर तळोदा येथील सहा, लोणखेडा, मोलगी व मंदाणा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या आता ७० झाली आहे.
तळोदा येथील मुंबई येथून परतलेल्या कोरोनाची लक्षणे असणाऱ्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीय व अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात मयत महिलेच्या मुलाचा अहवाल सर्वप्रथम पॉझिटिव्ह आला होता़ दरम्यान त्याच्या संपर्कातील सहा जणांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्क साखळीत १३ जणांना कोरोनाची लागण झाली होती़यातील तब्बल सहा जणांनी कोरोनाशी लढा देत त्यावर मात केली आहे. यात मोठा माळीवाडा भागातील चार, काकाशेठ गल्ली एक तर शिवराम नगरातील एक अशा सहा जणांचा समावेश आहे़ शनिवारी महिलेच्या मुलाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर उर्वरित बारा जणांपैकी सहा जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने ते शहरवासीयांसाठी दिलासादायक वृत्त ठरले आहे. असे असले तरी १४ दिवस त्यांना क्वारंटाईन राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, २५ जून रोजी तळोदा येथील मीरा कॉलनीतील एका दाम्पत्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे तळोद्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५ वर गेली होती. आता त्यातील सात जण कोरोणामुक्त झाले असून आठ जणांवर उपचार सुरू आहेत.
नंदुरबार शहरातील मण्यार मोहल्ला येथील १, मंदाणे व लोणखेडा ता़ शहादा येथील प्रत्येकी एक आणि मोलगी येथील एक अशा चौघांनाही रविवारी घरी सोडण्यात आले़ सर्व १० रुग्णांना आरोग्य विभागाने सन्मानपूर्वक शुभेच्छा देत घराकडे रवाना केले़

 

Web Title: Report of 6 persons in the district is positive, 10 persons are corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.