शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सुसरी वळण बंधाऱ्याच्या पाटचाऱ्यांची दुरुस्ती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST

निवेदनात म्हटले आहे की, सुसरी वळण बंधारा हा सुसरी नदीवर होळमोहिदा गावाजवळ गोमाई नदीवर बांधलेला आहे. या बंधाऱ्यातील पाणी ...

निवेदनात म्हटले आहे की, सुसरी वळण बंधारा हा सुसरी नदीवर होळमोहिदा गावाजवळ गोमाई नदीवर बांधलेला आहे. या बंधाऱ्यातील पाणी पावसाळ्यात खरीप हंगामात सोडले जाते. मुख्य कालव्यातून वितरिकांद्वारे होळ, मोहिदा, उंटावद, तिखोरा, पिंगाणे, कलसाडी, काथर्दा, भादा, धुरखेडा या शिवारातील दोन हजार २२६ हेक्टर क्षेत्र सिंचित करते. या वितरिकांची लांबी सुमारे २० किलोमीटर असून, त्यामुळे परिसरातील बोअरवेलची व विहिरींची पाण्याची पातळी वाढलेली असते. परंतु वळण बंधाऱ्याची सध्याची स्थिती लक्षात घेता त्याची उंची साधारण चार ते पाच फूट वाढविणे आवश्यक आहे. जेणेकरून पाणीसाठा वाढून पूर्ण क्षमतेने सर्व वितरिकांद्वारे मुबलक प्रमाणात लाभार्थ्यांना मिळू शकेल. तसेच मुख्य कालव्याचा पहिल्या व दुसऱ्या किलोमीटर लांबीत बांधकामे तुटल्याने व भराव झाल्यामुळे पाणी पुढे वाहू शकत नाही. तसेच तिसऱ्या व चौथ्या किलोमीटर लांबीत जागोजागी गाळ साचलेला आहे. तसेच पाइप मोऱ्यांची दुरुस्ती व काही काँक्रीटच्या भिंती तुटलेल्या असून, त्याचे बांधकाम करण्याची आवश्यकता आहे. मुख्य बंधाऱ्याची उंची वाढविणे व मुख्य कालव्यापासून चार किलोमीटरपर्यंतच्या वितरिका दुरुस्त करून त्याचे आवश्यक त्याठिकाणी काँक्रीटीकरण केल्यास पाणी पूर्ण क्षमतेने लाभार्थ्यांना मिळू शकेल आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदनावर तालुक्यातील होळ, उंटावद, तिखोरा या गावातील लाभधारक शेतकऱ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

शहादा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी केलेली मागणी योग्य असून, सुसरी वळण बंधाऱ्यातील पाटचाऱ्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. मी पाटबंधारेमंत्री असताना या बंधाऱ्यांची निर्मिती झाली असल्याने या बंधाऱ्याचे महत्त्व मला माहिती आहे. शेतकऱ्यांचे निवेदन प्राप्त झाल्यानंतर लागलीच पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना फोनवरून त्वरित कामाचे अंदाजपत्रक तयार करून निधी मंजुरीसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. पाटबंधारे विभागाने अंदाजपत्रक सादर केल्यानंतर राज्य शासनामार्फत तत्काळ यासाठी निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू.

-एकनाथ खडसे, माजी मंत्री