शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

अनाथांसोबत नाते आणि निराधारांना आधार यातून जीवन होतयं साकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 21:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तळोदा शहरात हातोडा रस्त्याला लागून एका कोपऱ्यात निराधार आणि अनाथ बालकांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तळोदा शहरात हातोडा रस्त्याला लागून एका कोपऱ्यात निराधार आणि अनाथ बालकांचे निवासी वसतीगृह आहे़ किमान १०० पेक्षा अधिक मुला-मुलींचे आश्रमस्थान असलेल्या या जागेवर श्रम आणि माया यातून जीवन साकारलं जात आहे़ निराधारांचा हा आधार होण्याचं काम करत आहेत वंदनाबाई तोरवणे़मूळ साक्री तालुक्यातील रहिवासी असलेल्या वंदनाबाई तोरवणे यांनी २० वर्षापूर्वी तळोदा दावलशा बाबा उन्नती मंडळाचे कल्याणी बालसदन सुरु केले होते़ प्रामुख्याने निराधार असलेल्या मुलामुलींनी कळत्या वयात येईलपर्यंत छत देऊन त्यांना शिक्षण आणि संस्कार देण्याचा उपक्रम होता़ प्रारंभी सर्वांनाच येतात तशा अडचणी वंदना तोरवणे यांनाही आल्या़ परंतू सतत मुलांच्या संपर्कात राहून त्यांना प्रगल्भ बनवण्यासाठी झटत राहिल्याने त्यांनी रोवलेल्या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे़ तळोदा शहरातील हे कल्याणी बालसदन दुर्गम आदिवासी भागासह सपाटीच्या गावांमधील निराधार बालकांसाठी हक्काचे स्थान आहे़ याठिकाणी आजघडीस किमान १०० पेक्षा अधिक मुले आणि तेवढ्याच मुली आश्रित म्हणून आहे़ निवास आणि भोजनासोबत शिक्षणाची गरज भागवून त्यांना समाजात वावरण्याचे बळ या माध्यमातून देण्यात येत आहे़ सेवाभावी नागरिकांचा पाठिंबा आणि शासनाच्या विविध योजना या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमातून आजवर १०० पेक्षा अधिक युवतींचे विवाह करुन त्यांना सुखी संसाराला लावण्यात वंदनाबार्इंचा मोठा पुढाकार आहे़ सोबतच १८ वर्षापर्यंत येथे शिक्षण घेऊन बाहेरील शहरांमध्ये छोट्या-मोठ्या हुद्द्यांवर नोकरी करणाºया युवकवर्गाचंीही संख्याही कमी नाही़ हे युवक वर्षातून एकदा येथे भेटही देतात़

४प्रामुख्याने माता पिता किंवा एकल पालकत्त्व असलेल्या मुले आणि मुलींचा सांभाळ करण्याची जबाबदारी कल्याणी बालसदनाच्या वंदनाबाई तोरवणे यांनी गेल्या २० वर्षात समर्थपणे पेलली आहे़ बऱ्याच वेळा मातापिता किंवा नातेवाईक यांची कोणतीही माहिती नसलेले बेवारस बालकांचाही सांभाळ करुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न येथून करण्यात येतो़ मुलांना भविष्यात अडचणी येऊ नयेत तसेच त्यांच्या आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून स्वत:ची कामे स्वत:च करण्याचा दंडक येथे आहे़ मुलींकडून परसबाग फुलवण्यासह इतर कामांना प्राधान्याने केले जाते़ यातून त्यांच्यात वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाल्याचे वंदनाबाई तोरवणे सांगतात़ नंदुरबार जिल्ह्यात चिमुकल्या बालकांना एवढ्या चांगल्या प्रकारे प्रवाहात आणण्याचे हे उल्लेखनिय कार्य असल्याचे नेहमीच सांगण्यात येते़ मुला-मुलींची राहणीमान सुधारावी यासाठी त्यांच्यावर आरोग्य चांगले ठेवण्याबाबत संस्कार करण्याची जबाबदारीही वंदनाबाई आणि त्यांच्यासोबत काम करणारे त्यांचे सहकारी आनंदाने स्विकारत आहेत़४अनाथ आणि एकपालकत्त्व असलेल्या मुलींचे विवाह लावून त्यांना संसाराला लावण्यासह वंदनाबाई ह्या तळोदा तालुक्याच्या विविध भागातील विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित महिलांसाठी कार्य करतात़ यात दारिद्र्य रेषेखालील महिलांना विविध योजनांचा न्याय मिळावा यासाठी त्याचा पाठपुरावा शासनाकडे करत आहेत़ महिलांना रेशन कार्ड मिळवून देण्यासह त्यांचे जीवनमान सुधारुन त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून परिश्रम घेण्यात येत आहे़ यापार्श्वभूमी येत्या काळात महिलांची रोजगार चळवळ उभारण्याचा त्यांचा मानस आहे़