शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

आसाणे येथे जयहिंद फाउंडेशनतर्फे भरती प्रशिक्षण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

आसाणे गावातील मैदानावर झालेल्या शिबिरात नंदुरबार, नवापूर, शहादा, धडगाव तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील साक्री व शिंदखेडा तालुक्यातून सुमारे १५० युवक ...

आसाणे गावातील मैदानावर झालेल्या शिबिरात नंदुरबार, नवापूर, शहादा, धडगाव तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील साक्री व शिंदखेडा तालुक्यातून सुमारे १५० युवक सहभागी झाले होते. यावेळी युवकांसाठी १ हजार ६०० मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेला हेमंत पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवली. दरम्यान मार्गदर्शन शिबिरात हर्षल पाटील व महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी आगामी नोकर भरतीबाबतची माहिती देण्यात आली. १६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी जयहिंद फाउंडेशन व भारत पंडित शेलार यांच्यातर्फे ३ हजार १०० रुपयांचे प्रथम, पोलीस कर्मचारी हेमंत महाले व जितेंद्र महाले यांच्याकडून २ हजार १०० रुपयांचे द्वितीय तर यांच्याकडून १ हजार १०० रुपयांचे तृतीय पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. उत्तेजनार्थ बक्षीस जयहिंद फाउंडेशनकडून देण्यात आले, स्पर्धेत बुरझड, ता. धुळे येथील पंकज बालू बागूल प्रथम, नंदुरबार येथील देवेंद्र वसावे द्वितीय, ऐचाळे येथील प्रफुल्ल धनगर व रोशन पानपाटील दोघेही संयुक्तपणे तृतीय स्थानी आले. स्पर्धेचे उत्तेजनार्थ बक्षीस तुलसीदास पाटील यास देण्यात आले. प्रसंगी समाधान पाटील यांनी सर्वच घटकांसाठी विकास व सेवाभावी म्हणून काम करणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास शाॅर्ट सर्व्हिस कमिशन व राखीव दलात निवड झालेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष योगेश महाले, दिनेश पाटील, पोलीस पाटील पंढरी पाटील, भूषण पाटील, संदीप पाटील, रवींद्र पाटील, योगेश मिस्त्री, दिनेश बाबूलाल, हेमंत पाटील, योगेश पाटील, बापू पाटील, दिलभर पाटील, राजू पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक जयहिंद फाउंडेशनचे अध्यक्ष समाधान किसन पाटील यांनी आभार उपाध्यक्ष योगेश दगडू पाटील यांनी मानले.