पहिल्या लॅाटरीतील निम्मे जागांसाठी पुन्हा प्रक्रीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 09:06 PM2020-10-21T21:06:48+5:302020-10-21T21:06:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे यंदा आरटीई प्रवेश प्रक्रीया काही प्रमाणात रखडली आहे. लॅाटरीद्वारे निवड करण्यात आलेल्या निम्मे ...

Re-processing for half the seats in the first lottery | पहिल्या लॅाटरीतील निम्मे जागांसाठी पुन्हा प्रक्रीया

पहिल्या लॅाटरीतील निम्मे जागांसाठी पुन्हा प्रक्रीया

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुळे यंदा आरटीई प्रवेश प्रक्रीया काही प्रमाणात रखडली आहे. लॅाटरीद्वारे निवड करण्यात आलेल्या निम्मे विद्यार्थ्यांनी प्रवेशाला प्रतिसाद दिला नसल्याने व निकष पुर्ण न केल्याने त्या जागा रिक्त आहेत.  त्यामुळे निवड झालेल्या अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना पुन्हा मेसेज पाठविले जात आहे. 
आरटीईच्या पहिल्या राऊंडमध्ये ४१२ विद्यार्थ्यांची ऑनलाईन निवड झाली आहे. कोरोनामुळे यंदा वारंवार मुदतवाढ देण्यात आली आहे. शाळा स्तरावर तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आली. त्यात मुख्याध्यापकांनी ऑनलाईन त्यांच्या लॅागीन वरून पालकांना ऑनलाईन दिनांक देण्यात येऊन मेसेज पाठविण्यात आले होते. यंदा कोरोनामुळे फारसा प्रतिसाद व उत्सूकता नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी यंदा पहिल्या फेरीतील निम्मे जागा रिक्त असल्याचे चित्र आहे. या महिन्याअखेर त्या जागा भरल्या जातील अशी अपेक्षा आहे. नामांकित शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालकांची धडपड असते. परंतु जागा कमी आणि इच्छूक जास्त त्यामुळे लॅाटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जात असते. दरम्यान, शाळांना त्यांच्या हिस्स्याची फी ऑनलाईन स्वरूपात वितरीत केली जात असल्याचे चित्र आहे. 

Web Title: Re-processing for half the seats in the first lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.