शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

लसूणची आवक वाढल्याने दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:59 IST

नंदुरबार : शहरातील बाजारात गेल्या आठ दिवसात लसूणची आवक वाढल्याने दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. गावरान लसूण १५० रूपये, ...

नंदुरबार : शहरातील बाजारात गेल्या आठ दिवसात लसूणची आवक वाढल्याने दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. गावरान लसूण १५० रूपये, मोठी लसूण ५० ते ८० रूपये किलो दराने बाजारात उपलब्ध झाली आहे. लसूणचे दर कमी झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी स्वत: बाजारात लसूणची विक्री करत आहेत.

मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज

नंदुरबार : शहरालगतच्या ग्रामीण हद्दीतील वसाहतींमध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. यातून किरकोळ अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी याकडे लक्ष देत जनावरांच्या मालकांना समज देण्याची मागणी होत आहे.

वाहतूकदारांना मार्गदर्शन करावे

नंदुरबार : जळगाव जिल्ह्यात पपईचा ट्रक उलटून १५ जण ठार झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, जानेवारी महिन्यात तोरणमाळ येथेही भीषण अपघात झाला होता. या अपघातातही सहा मजुरांचा बळी गेला होता. बेशिस्त वाहतुकीमुळे हे अपघात झाल्याचे समोर आले होते. जिल्ह्यात अद्यापही मजुरांची बेशिस्तपणे वाहतूक होत असल्याने वाहतूकदारांना योग्य शिस्त लावण्याची मागणी होत आहे.

खर्डी नदी पुलावर कठड्यांची मागणी

तळोदा : शहरातील खर्डी नदीच्या पुलावर कठडे नसल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत. याठिकाणी कठडे उभारण्याची मागणी अनेकदा करुनही कार्यवाही करण्यात आलेली नाही. प्रशासनाने पुलावर चांगल्या दर्जाचे कठडे उभारण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.

कोळद्यापर्यंतचे खड्डे ठरताहेत त्रासदायक

नंदुरबार : नंदुरबार ते कोळदा या दरम्यान पडलेले खड्डे नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत. हे खड्डे बुजविण्याची सातत्याने मागणी करुनही कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त हाेत आहे. कोळदा गावापर्यंत काही ठिकाणी खड्डे बुजविले आहेत तर काही ठिकाणी खड्डे ‘जैसे थे’च आहेत.

वाहतूक कोंडीमुळे वाढतात अडचणी

नंदुरबार : शहरातील सोनार खुंटावर सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास याठिकाणी पादचाऱ्यांनाही चालण्यास जागा उरत नाही. याकडे वाहतूक शाखेने गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या मार्गावर दररोज सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी होते.