शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
3
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
4
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
5
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
6
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
7
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
8
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
9
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
10
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
11
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
12
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
13
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
14
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
15
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
16
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
17
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
18
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
19
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
20
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

अखेरच्या बॉलर्पयत रंगला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:43 PM

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ट¦ेंटी-ट¦ेंटी सामन्यात अखेरच्या बॉलर्पयत मॅच कुणाच्या बाजुने फिरेल हे जसे सांगता ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ट¦ेंटी-ट¦ेंटी सामन्यात अखेरच्या बॉलर्पयत मॅच कुणाच्या बाजुने फिरेल हे जसे सांगता येत नाही तशीच स्थिती जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत झाली. अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपकडून शेवटचा बॉल ‘वाईड’ पडला. परंतु उपाध्यक्षपदाच्या निवडीत मात्र भाजपने शेवटचा बॉल योग्य टप्प्यात टाकला,  काँग्रेस-सेनेने तो योग्य रित्या टोलावल्याने उपाध्यक्षपदाचीही मॅच त्यांनी जिंकली. पडद्यामागच्या राजकीय घडामोडींमुळे शेवटर्पयत उत्कंठावर्धक ठरलेली ही निवडणूक अनेकांचा काळजाचा ठोका चुकविणारी ठरली.  जिल्हा परिषद निवडणुकीत 56 जागांपैकी काँग्रेस, भाजपला प्रत्येकी 23 जागा मिळाल्या. शिवसेनेला 7 व राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या. बहुमतासाठी 29 चा आकडा पार करण्यासाठी काँग्रेस व भाजपलाही शिवसेनेशिवाय पर्याय नव्हता. दुसरीकडे भाजप अर्थात आमदार डॉ.विजयकुमार गावीत व माजी आमदार शरद गावीत यांच्यामुळे निवडून आलेले राष्ट्रवादीचे तीन सदस्य भाजपला मिळाले, तरीही बहुमत लांबच होते. त्यामुळे शिवसेना अखेर्पयत काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून होते. सेनेने अपेक्षेप्रमाणे काँग्रेससोबत जाणे पसंत केल्याने त्यांची सत्ता बसली. परंतु या सर्व नाटय़ामागे पडद्याआड अनेक राजकीय घडामोडी घडल्या. कुठे प्रतिष्ठा, कुठे आगामी राजकारणाची दिशा, कुठे मुलांचे भवितव्य तर कुठे आपलीच दुकानदारी लावण्यासाठी प्रयत्न झाले. त्यामुळे शेवटच्या क्षणार्पयत धक्कातंत्र काय  राहील याचीच उत्कंठा सर्वाना लागून होती.सदस्य बाहेरगावी..सत्ता स्थापनेसाठी भाजपला अवघे तीन तर काँग्रेसला सहा सदस्य लागणार होते. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता गृहीत धरून काँग्रेसने आपले सदस्य सुरत येथे पाठविले तर भाजपने आपले सदस्य शिरपूर येथे पाठविले. शिवसेनेने देखील आपले सदस्य बाहेरगावी पाठविले. दुसरीकडे भाजप व काँग्रेसमध्ये पडद्याआड घडामोडी सुरू होत्या. शिवसेनेसोबत बार्गिनींग केली जात होती. प्रसंगी फोडाफोडीचीही तयारी ठेवण्यात आली होती. दोन दिवसात फिरले चक्रसत्ता स्थापनेसंदर्भात अवघ्या दोन दिवसात चक्रे फिरली. बुधवारी रात्री शिवसेना नेते आणि काँग्रेस नेते नवापूर येथे माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांच्या निवासस्थानी एकत्र आले. तेथे फाम्यरूला ठरला, परंतु तो अंतिम झाला नव्हता. दुसरीकडे भाजपनेही शिवसेना नेत्यांशी चर्चा सुरू ठेवली. सेनेच्या मागणीप्रमाणे उपाध्यक्षपद आणि सभापतीपद देण्याचे निश्चित झाले. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्येही चलबिचलता कायम राहिली. दुसरीकडे शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेच्या बाजुने झुकाव दाखविला. शिवाय वरिष्ठ पातळीवरूनही सेना नेत्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसला जवळ करण्याचे निर्देश दिलेच. त्यामुळे गुरुवारी पुन्हा काँग्रेस-सेनेची बैठक झाली आणि नवापुरातील फाम्र्यूला अंतिम झाला. काँग्रेसअंतर्गत अध्यक्षपदासाठी चुरस..काँग्रेसला शिवसेनेने पाठींबा दिल्याने त्यांचे संख्याबळ 30 झाल्याने त्यांची सत्ता स्थापन होईल हे निश्चित झाले. परंतु काँग्रेस अंतर्गत अध्यक्षपदासाठी नाव ठरवितांना चांगलीच चुरस झाली. अध्यक्षपदासाठी अर्ज भरेर्पयत माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे पूत्र आणि आमदार शिरिष नाईक यांचे बंधू अजीत नाईक यांचे नाव नक्की होते. परंतु अजीत की दिपक नाईक यावरही बरीच चर्चा अंतर्गत झडली. दोघा भावांनी मागणी केल्यामुळे नेत्यांपुढे पेच निर्माण झाला होता असे सूत्रांनी सांगितले. यातच माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आपल्या कन्येचे नाव पुढे केले. त्यामुळे काँग्रेसमध्ये पेच निर्माण झाला. अक्कलकुवा-धडगावला मंत्रीपद, नवापूरला आमदारकी, त्यामुळे आपल्याला जिल्हा परिषद अध्यक्षपद पाहिजे अशी रास्त अपेक्षा त्यांनी नेत्यांसमोर ठेवली. शिवाय खासदार डॉ.हिना गावीत यांच्यासमोर आगामी काळात काँग्रेसला उमेदवार आतापासूनच तयार करावयाचा असल्यास अॅड.सिमा वळवी हा भक्कम पर्याय राहणार हे पटवून देण्यात आले. त्यांची मागणी वरिष्ठांना कळविण्यात आली. वरिष्ठांनीही हिरवा कंदील दिल्याने अखेर शेवटच्या क्षणी अॅड.सिमा वळवी यांच्या नावावर एकमत झाले. परिणामी अजीत नाईक यांनी दाखल केलेला अर्ज मागे घेतला आणि सिमा वळवी यांचा मार्ग मोकळा झाला.दुसरीकडे भाजपनेही धक्कातंत्र राबविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे बाहेरगावी असलेले सर्व सदस्य शुक्रवारी सकाळी नंदुरबारात आले. सत्ता आमचीच राहिल यावर ते ठाम होते.अध्यक्षपदासाठी   आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या प}ी आणि खासदार डॉ.हिना गावीत यांच्या आई माजी जि.प.अध्यक्षा कुमुदिनी गावीत यांनीच अर्ज भरल्याने भाजपची काय खेळी राहील याबाबत उत्सूकता ताणली गेली. उपाध्यक्षपदासाठी देखील वजनदार नेते दिपक पाटील यांच्या प}ी जयश्री  पाटील यांनी अर्ज भरल्याने भाजप पुर्ण ताकदिने उतरले. परिणामी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत ऐनवेळी धक्कातंत्र राहील काय किंवा कसे याची प्रचंड उत्कंठा वाढली.अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी दमदार सदस्यांनी अर्ज भरल्याने काय होईल? याची उत्कंठा लागली होती. तीन वाजता सभा सुरू झाल्यावर भाजपच्या गटनेत्या व स्वत: उमेदवार कुमुदिनी गावीत यांनी काँग्रेसच्या सिमा वळवी यांना पाठींबा दिल्याने त्या निवडून आल्या. 4परंतु उपाध्यक्षपदासाठी काहीतरी गेम होईल अशी शक्यता वर्तविली जात होती. भाजप-राष्ट्रवादीने शेवटर्पयत ही निवडणूक लावून धरली. परिणामी काँग्रेस-सेनेची धाकधूक वाढली. सभागृहाबाहेरील काँग्रेस-सेनेच्या नेत्यांच्या चेह:यावरही ताण दिसून येत होता. चर्चाही रंगल्या, शिवसेनेचा गेम झाला? येथर्पयत चर्चाना सुरुवात झाली. परंतु काँग्रेस व सेनेचे सदस्य एकसंघ राहिल्याने 30 मते मिळून सेनेचे राम रघुवंशी निवडून आले.