शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राजविहीर ग्रामपंचायतीचा दारूबंदी व बॅण्ड न वाजविण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील राजाविहीर ग्रामपंचायतीने संपूर्ण दारूबंदीबरोबरच विविध कार्यक्रमांमध्ये बॅण्ड न वाजविण्याच्या ठराव एकमताने केला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील राजाविहीर ग्रामपंचायतीने संपूर्ण दारूबंदीबरोबरच विविध कार्यक्रमांमध्ये बॅण्ड न वाजविण्याच्या ठराव एकमताने केला आहे. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी. या निर्णयाचे जो उल्लंघन करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. दरम्यान या निर्णयाची प्रभावी अंमलबजाणीसाठी ग्रामस्थांनी तळोदा पोलिसांना निवेदन दिले आहे. तळोदा तालुक्यातील राजविहीर ग्रामपंचायतीची सभा पंचायत समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नागरिक सतीश वळवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य सोनी रोहिदास पाडवी, सरपंच लहू पाडवी, तंटामुक्तचे अध्यक्ष प्रवीण पाडवी, ग्रामपंचायत सदस्या शारदा पाडवी, गावकारभारी पुंजऱ्या पाडवी, पोलीसपाटील अजबसिंग पाडवी, यशवंत पाडवी, ग्रामसेवक ए.डी. वसावे उपस्थित होते. प्रारंभी ग्रामविकासाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर व्यसनाधीनतेवर चर्चा होऊन गावात कोणीही मादक द्रव्य व दारू सेवन करू नये. व्यसनाधीनतेपायी अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे दारूबंदी करण्यात यावी, असे ग्रामस्थ व महिलांनी सूचविले. याशिवाय आपल्या रूढी-परंपराच जतन करून बँडमुळे ग्रामस्थांना जो त्रास होतो त्यावरदेखील प्रतिबंध आणावा. विविध कार्यक्रमप्रसंगी बँडऐवजी ढोल वाजवावा, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसा ठरावदेखील ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाचे उल्लंघन करेल त्याचाविरोधात कायदेशीर कारवाईसह दंड वसूल करण्यात यावा, असेही ठरविण्यात आले. दरम्यान निर्णयाची प्रभावीपणे अंमलाबजावणी करण्यासाठी ग्रामस्थांनी तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदराज पाटील यांना निवेदन दिले . विशेषत: गावातील संपूर्ण दारूबंदीबाबत महिलांनी प्रभावी अंमलबाजावणी करण्याचा आग्रह अधिकाऱ्यांनी केला आहे.