शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

नवापुर येथे हाय प्रोफाईल जुगार अड्डयावर धाड, सहाजणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरापासून जवळच असलेल्या मोकळ्या मैदानात सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून ५७ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरापासून जवळच असलेल्या मोकळ्या मैदानात सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून ५७ हजार रुपये रोख व चारचाकी वाहनांसह एकुण २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात मोहन जगदीश दर्जी, आकाश शंकर दर्जी, रवींद्र हिरालाल चव्हाण, लक्ष्ममण दत्तू पाटील, अमर गोविंद सोनार सर्व रा.नवापूर व सुनील परशराम अग्रवाल रा.खांडबारा यांचा समावेश आहे. शहरातील पिंपळनेर चौफुलीजवळील पटांगणात हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी उशीरा कारवाई झाली.पोलिसांनी संशयीत सहाही जणांकडून एकुण ५७ हजार रुपये रोख, जुगाराची साधने तसेच चारचाकी चार वाहने असा एकुण २० लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलीस शिपाई योगेश साळवे यांच्या फिर्यादीवरून संशयीतांविरुद्ध जुगार कायदा,आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकताच एकच पळापळ झाली. परंतु पोलिसांनाी सर्वच संशयीतांना ताब्यात घेतले. जुगार खेळण्यासाठी अनेकजण महागड्या चारचाकी वाहनांनी आलेले होते. ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज महाजन व पथकाने केली.