शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त चालकांना ‘लगाम’ घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 11:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराच्या विविध भागातून होणारी बेशिस्त वाहतूक चिंतेचा विषय ठरत असून पोलीस दलाने यावर मार्ग ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराच्या विविध भागातून होणारी बेशिस्त वाहतूक चिंतेचा विषय ठरत असून पोलीस दलाने यावर मार्ग काढून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली़ पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांना संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी याबाबत निवेदन दिले आहे़निवेदनात शहरात वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे़ यात शहरात सम-विषम पार्किंग, एकेरी मार्ग, जड वाहनांचा वावर वाढल्याने वाहतूकीच फज्जा उडाला आहे़ महाराणा प्रताप चौकात लावण्यात येणाऱ्या लक्झरी बसेसचा प्रश्न पुन्हा गंभीर होत आहे़ याठिकाणी बसेस लावून चालक आणि क्लिनर हे रस्त्यावर अंघोळ करणे, कपडे बदलणे असे प्रकार घडत आहेत़ या बसेस शहरातील विलासराव देशमुख ट्रक टर्मिनस येथे हलवण्यात याव्यात, बेकायदेशीरपणे चालणारी खाजगी प्रवासी वाहने व तीनचाकी रिक्षांचे थांबे निश्चित करुन वाहतूकीची होणारी कोंडी थांबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे़दरम्यान वाहतूकीसंदर्भात पोलीस अधिक्षकांनी कारवाई व नियोजन करण्याचे सूचित करुनही त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याची माहितीही यावेळी संघटनेकडून देण्यात आली़ यासंदर्भात जिल्हाधिकारी, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व एसटी महामंडळ यांची संयुक्त बैठक घेऊन कारवाई करण्याची मागणीही पोलीस अधिक्षकांसोबत झालेल्या चर्चेत करण्यात आली़शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करुन दंड वसुली होत आहे़ यातूनही या वाहनधारकांना शिस्त नसल्याने रस्त्यांवर वाहतूक सुरळीत करण्याची मागणी संघटनेने पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्याकडे केली़