बेशिस्त चालकांना ‘लगाम’ घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:37 AM2019-12-14T11:37:03+5:302019-12-14T11:37:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराच्या विविध भागातून होणारी बेशिस्त वाहतूक चिंतेचा विषय ठरत असून पोलीस दलाने यावर मार्ग ...

Put the 'bridle' on to the best drivers | बेशिस्त चालकांना ‘लगाम’ घाला

बेशिस्त चालकांना ‘लगाम’ घाला

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहराच्या विविध भागातून होणारी बेशिस्त वाहतूक चिंतेचा विषय ठरत असून पोलीस दलाने यावर मार्ग काढून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली़ पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांना संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी याबाबत निवेदन दिले आहे़
निवेदनात शहरात वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे़ यात शहरात सम-विषम पार्किंग, एकेरी मार्ग, जड वाहनांचा वावर वाढल्याने वाहतूकीच फज्जा उडाला आहे़ महाराणा प्रताप चौकात लावण्यात येणाऱ्या लक्झरी बसेसचा प्रश्न पुन्हा गंभीर होत आहे़ याठिकाणी बसेस लावून चालक आणि क्लिनर हे रस्त्यावर अंघोळ करणे, कपडे बदलणे असे प्रकार घडत आहेत़ या बसेस शहरातील विलासराव देशमुख ट्रक टर्मिनस येथे हलवण्यात याव्यात, बेकायदेशीरपणे चालणारी खाजगी प्रवासी वाहने व तीनचाकी रिक्षांचे थांबे निश्चित करुन वाहतूकीची होणारी कोंडी थांबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे़
दरम्यान वाहतूकीसंदर्भात पोलीस अधिक्षकांनी कारवाई व नियोजन करण्याचे सूचित करुनही त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याची माहितीही यावेळी संघटनेकडून देण्यात आली़ यासंदर्भात जिल्हाधिकारी, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व एसटी महामंडळ यांची संयुक्त बैठक घेऊन कारवाई करण्याची मागणीही पोलीस अधिक्षकांसोबत झालेल्या चर्चेत करण्यात आली़
शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करुन दंड वसुली होत आहे़ यातूनही या वाहनधारकांना शिस्त नसल्याने रस्त्यांवर वाहतूक सुरळीत करण्याची मागणी संघटनेने पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्याकडे केली़

Web Title: Put the 'bridle' on to the best drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.