शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जनजीवन पुन्हा ‘स्टॉपडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा वाढता संसर्ग थोपवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत शुक्रवारपर्यंत संपूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा वाढता संसर्ग थोपवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत शुक्रवारपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत़ आदेशांची मंगळवारी अंमलबजावणी करण्यात आली़ यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून पूर्ववत झालेले जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले असून शहरात येणारे सर्व रस्ते सील केल्याने बाहेर पडलेल्यांचे हाल झाले़जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन मंगळवारी सकाळपासून कामाला लागले होते़ मंगळवार असल्याने सकाळी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली होती़ दरम्यान सकाळी आठ ते दुपारी १२ याच वेळेत बाजारपेठा सुरु ठेवण्याचे आदेश असल्याने व्यवहारांना वेग आला होता़़ १२ वाजेनंतर शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा वगळून छोटे-मोठे व्यवसाय बंद करण्यात आल्याने लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्याची आठवण देणारा शुकशुकाट दिसून आला होता़ शहराचे प्रवेशद्वार असलेल्या धुळे चौफुली, नवापुर चौफुली, करण चौफुली व तळोदा रोड याठिकाणी बॅरीकेडींग करुन शहरात येणाऱ्यांना रोखण्यात आले़ जगताप वाडी, जाणता राजा चौक, गुरुकुल नगर चौफुली, करण चौफुली, जिजामाता कॉेलेज जवळील चौक यासह शहरात येणाºया प्रत्येक रस्त्यावर बॅरीकेड लावून प्रवेश बंदी करण्यात आली होती़ दुसरीकडे शहरातील गांधी पुतळा, हाटदरवाजा, गिरीविहार, नेहरु चौक, पालिका परिसर यासह अंधारे चौक परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करुन येणाºया-जाणाऱ्यांची चौकशी सुरु करण्यात आली होती़ ग्रामीण भागातून आलेल्यांना या निर्णयाची माहिती नसल्याने त्यांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले़ दुपारी ग्रामीण भागातून येणाºया अनेकांना शहरात प्रवेशाच मिळाला नाही़

चार दिवसांच्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शहरात येणारे सर्वच रस्ते बॅरीकेड लावून बंद करण्यात आले़ साक्री नाका परिसरातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पाच रस्ते आहेत़ प्रत्येक रस्ता सील झाल्याने कोकणी हिल कडून येणारे व त्या भागात जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले़ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस अधिक्षक कार्यालय, प्रकल्प कार्यालय, जिल्हा रुग्णालय यासह इतर कार्यालयाकडून येणाऱ्यांना शहरातील साक्री नाका मार्ग सोयीस्कर आहे़ परंतू पाच ठिकाणी रस्ता सिल असल्याने कर्मचारी सायंकाळी घराकडे जाण्यासाठी धडपडत होते़ वळणरस्त्याला लागून असलेल्या सर्वच रस्त्यावर बॅरीकेड असल्याने अनेकांना शहराला वळसा मारुन घरी पोहोचावे लागले़

प्रशासनाकडून मिळालेल्या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना व पेट्रोल पंप सकाळी ८ ते १२ या वेळेत सुरू ठेवण्यात आल्या होत्या़ शासकीय कार्यालये नेहमीप्रमाणे सुरु होते़ जीवनावश्यक सेवेतील औषधांची दुकाने व दवाखाने नियमित सुरु ठेवण्यात आले होते़ जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने कारवाईच्या भितीने नागरिक घराबाहेर पडत नव्हते़दरम्यान साक्री नाका परिसरातील सार्वजनिक शौचालयांचा परिसर सील करण्यात आल्याने या भागातील नागरिकांचे हाल होत होते़ त्यांच्या सोयीसाठी सायंकाळी येथून बॅरीकेड काढून पुलापर्यंत सरकवण्यात आले़

जाणता राजा चौक, महेश स्तंभ चौक, सी.बी पेट्रोल पंप परिसर, संत सेना चौक, करण चौफुली, धानोरा रस्त्यावर बॅरीकेड लावून सील करण्यात आले आहेत़ गर्दी कमी होवून वाहनांना प्रवेश मिळणार नाही़ परंतू अनेकांनी पर्यायी मार्ग शोधत वाहने काढण्याची कसरत सुरु केली होती़ वळणरस्त्यालगतच्या गुरुकुल नगर चौफुलीकडून येणाऱ्या चक्री मार्गावर टाकलेले बॅरीकेड दुपारी अचानक तुटले होते़ ते काढून नवीन बॅरीकेटींग करण्यात आले़