शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरात भजन-प्रवचनाला परवानगी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मंदिरात भजनाला परवानगी व लॉकडाऊनच्या काळात अडचणीत आलेल्या गायक-वादक आदी कलावंतांना शासनाने विशेष मदत ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मंदिरात भजनाला परवानगी व लॉकडाऊनच्या काळात अडचणीत आलेल्या गायक-वादक आदी कलावंतांना शासनाने विशेष मदत करावी याबाबतचे निवेदन अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आले.
अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज व भाजपचे अध्यात्मिक सेलचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले महाराज व अखिल भारतीय संन्यासी संप्रदायाचे स्वामी विश्वेश्वरानंद यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, देशात कोरोनासारख्या संकटाला तोंड देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे सर्वच घटक पालन करीत आहेत. लग्नविधी, मंगलकार्य, अंत्यविधीसाठी परवानगी देण्यात आली असून ठराविक वेळेत दुकाने उघडून सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत. असे असताना छोट्या छोट्या मंदिरातील भजन, पूजन, काकडा आरती आदी उपासनापद्धती बंद आहेत. याआधी शासनाकडे निवेदन देऊनही व मंडळाच्या जिल्ह्याजिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही मंदिरातील भजन, हरिपाठ, काकडा आदींना परवानगी देण्याविषयी विचार शासनाकडून झालेला नाही. लॉकडाऊनच्या काळात अडचणीत असलेल्या गायक, वादक, लहान प्रवचनकार आदींना शासनाकडून रेशनचे धान्य स्वरूपात काही रक्कम मिळावी याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही अद्यापही त्याचा विचार झालेला नाही. या सर्व बाबींचा विचार करून किमान २५ ते ५० लोकांना लहान मंदिरात नित्याचे भजन-पूजन करण्याची व प्रवचन करण्याची शासनाने परवानगी द्यावी व लॉकडाऊनच्या काळातील अडचणीत असलेल्या कलावंतांना शासनाने तात्काळ मदत करावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. राज्यपाल यांच्याशी चर्चा होऊन शासनास तसे निर्देश करण्यात येतील, असे आश्वासन आचार्य तुषार भोसले महाराज, ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज व स्वामी विश्वेश्वरानंद यांना राज्यपालांनी दिले. त्यामुळे काकडा, हरिपाठ व लहान प्रवचन आदींसाठी किमान २५ ते ५० लोकांना परवानगी मिळेल याची खात्री वाटते, अशी माहिती खान्देश विभागीय अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज माळी यांनी दिली.