चौफुलीवरील खड्ड्यांमध्ये पूजा करून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:12 IST2020-08-27T12:11:56+5:302020-08-27T12:12:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय महामार्ग विभाग,धुळे यांच्या अंतर्गत येणाऱ्या बायपासवरील करण अर्थात कोरीट चौफुलीवरील खड्ड्यांबाबत जयहिंद फाउंडेशन ...

Protest by worshiping in the pits on Chaufuli | चौफुलीवरील खड्ड्यांमध्ये पूजा करून निषेध

चौफुलीवरील खड्ड्यांमध्ये पूजा करून निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राष्ट्रीय महामार्ग विभाग,धुळे यांच्या अंतर्गत येणाऱ्या बायपासवरील करण अर्थात कोरीट चौफुलीवरील खड्ड्यांबाबत जयहिंद फाउंडेशन मार्फत खड्ड्यांची पूजा करून संबंधित विभागाच्या निषेध करण्यात आला.
नंदुरबार शहराच्या उत्तरेला असणाºया करण चौफुली पासून शहादा, तळोदा, अक्कलकुवा मार्गे गुजरात व मध्यप्रदेशात जाण्यासाठी महामार्ग उपलब्ध आहे. तसेच या भागात जाणाºया प्रत्येक वाहनाला करण चौफुलीमार्गे जावे लागते. या परिसारच्या पुढे मोठ्या प्रमाणावर वस्ती देखील आहे. आज वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या चौफुलीवर एक ते दीड फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. भरपावसात आपले वाहन घेऊन जाणे म्हणजे अपघाताला निमंत्रणच आहे. सामान्य नागरिकांतर्फे वारंवार आंदोलने व निवेदने देऊनही राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
येत्या आठ दिवसात सदर रस्त्याचे कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आली नाही तर प्रत्येक आठ दिवसातअशाच प्रकारे निषेध करण्यात येईल. याविषयी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील फाउंडेशन मार्फत संपर्क करण्यात आला होता त्यांच्याकडून एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. निषेधवेळी दिग्विजय राजपूत, जयेश सोनार, जितेश शर्मा, राहुल राजपूत व सागर ठाकरे उपस्थित होते.

Web Title: Protest by worshiping in the pits on Chaufuli