शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सहा एकर क्षेत्रात घेतले 500 क्विंटल उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 14:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय झाल्याची धारणा झाली आहे; परंतु योग्य नियोजन केल्यास तोट्यातील शेतीही ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय झाल्याची धारणा झाली आहे; परंतु योग्य नियोजन केल्यास तोट्यातील शेतीही नफ्यात येऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे ब्राह्मणपुरी येथील युवा शेतकरी अविनाश युवराज पाटील यांचे देता येईल. त्यांनी सहा एकरांत तीन महिन्यांत तब्बल ५०० क्विंटल मिरचीचे उत्पादन घेतले. या मिरचीला बाजारात सरासरी ३० रुपये किलो दर मिळाला.शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील युवा शेतकरी अविनाश युवराज पाटील यांनी सहा एकर क्षेत्रात मिरची पिकाची लागवड करण्याचे ठरवले. त्यांना गुजरात राज्यातील पिंपळोद,ता. निझर येथील सुविधा ग्रुपचे मिरची उत्पादक शेतकरी योगेश पटेल यांचे मार्गदर्शन लाभले. मिरची पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी योग्य नियोजन करून योगेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी, खत, सूक्ष्म अन्यद्रव्ये याचे योग्य नियोजन केले. पाण्याची बचत व्हावी यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यात आले.अविनाश पाटील हे पदवीधर असून, त्यांनी नोकरी न करता गावातच उत्पन्नाचे साधन तयार केले. पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक शेतीकडे पावले टाकत शेतात मिरची पिकाची लागवड केली. मिरची विक्रीतून त्यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे.शिमला मिरचीची लागवडब्राह्मणपुरी येथील शेतकरी अविनाश पाटील यांनी एकरभर क्षेत्रात नर्सरीची उभारणी करीत शिमला मिरचीचीही लागवड केली आहे. शिमला मिरचीच्या लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांत तोडणी करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

आखाती देशात मिरचीची निर्यातअविनाश पाटील यांच्या मिरचीला विदेशातूनही मागणी येत आहे. पिंपळोद येथील योगेश पटेल यांच्या मदतीने त्यांची मिरची मुंबईसह आखाती देशातही निर्यात  केली जात आहे. स्थानिक बाजारभावापेक्षा अधिकचा भाव त्यांना मिळाला. त्यांनी सुरू केलेल्या या प्रयोगाचा परिसरातील शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. गुजरात राज्यातील पिंपळोद, ता.निझर येथील योगेश पटेल यांच्या सुविधा ग्रुपच्या माध्यमातून निर्यातीसाठी योग्य असणाऱ्या मिरचीची लागवड पाटील यांनी केली आहे. मिरचीचे पीक तयार झाले की याच ग्रुपच्या माध्यमातून तोडणी करून आवश्यक  ती खबरदारी घेऊन लाल रंगाच्या कट्ट्यांमध्ये पॅकिंग केले जाते.