शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांमुळे सारंगखेडा आरोग्य केंद्रात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:38 IST

शहादा तालुक्यातील सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत सहा आरोग्य उपकेंद्रे संलग्न असून बहुतांश गावे आदिवासी बहुल वस्तीची आहेत. कार्यक्षेत्रात पंधरा ...

शहादा तालुक्यातील सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत सहा आरोग्य उपकेंद्रे संलग्न असून बहुतांश गावे आदिवासी बहुल वस्तीची आहेत. कार्यक्षेत्रात पंधरा गावे, सात आरोग्य उपकेंद्रे, ३०.००० च्या वर लोकसंख्या आहे. परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्रांत मंजूर केलेल्या ३८ पैकी १५ पदे रिक्त असल्याने अडचणी येत आहेत. केवळ ११ पदेच कार्यरत असतानाही त्यांच्याकडून कामकाज सुरू आहे. आरोग्य केंद्रात आरोग्य सहायक, साहाय्यिका, कंत्राटी जीएनएम, परिचर, कंत्राटी आरोग्यसेविका, स्विपर, वाहनचालक यांची प्रत्येकी एक, तर चार आरोग्यसेविका आणि दोन आरोग्यसेवक अशी १५ पदे रिक्त आहेत.

सध्या नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी काही काही कर्मचारी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण, स्वॅब कलेक्शन सर्वेक्षण यांसाठी जात आहेत. यात काहींना मोहिदा व सारंगखेडा येथील विलगीकरण कक्षात ड्यूटीसाठी पाठवण्यात येत आहे. हे कर्तव्य बजावत असताना काही स्वत: तर काहींच्या कुटुंबात कोणीतरी हमखास आजारी असतानाही त्यांच्याकडून कर्तव्य बजावण्यात येत आहे. गेल्या दीड महिन्यात कार्यक्षेत्रातील १५० च्या वर कोरोनाबाधित रुग्ण निघाले. त्यात दुर्दैवाने काही मृत झाले व १२० पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त होत घरी परतले; तर काही उपचार घेत आहेत; त्यामुळे आता सारंगखेडासह परिसरातील रुग्णसंख्या ओसरली असली तरी ग्रामस्थांनी शासकीय नियम पाळावेत असे आवाहन करण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा, डॉ. किशोर पाटील, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी. एम. पाटील, औषधनिर्माण अधिकारी एम. बी. परदेशी, आरोग्य सहायक आर. आर. महीरे हे या ठिकाणी सध्या सेवा देत आहेत. सद्य:स्थितीत एकूण कायमस्वरूपी व कंत्राटी आरोग्य कर्मचारी मिळून २३ पैकी ११ कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर आहेत.